पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना निवडणूक प्रचारादरम्यान पायाला आणि मानेला दुखापत झाली होती. दरम्यान, आपल्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला होता. सध्या ममता बॅनर्जी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या संपूर्ण घटनेचा निषेध केला आहे. तसंच कठिण निवडणूक मोहीम आणि संघर्ष असला तरी कोणीही हिंसाचारावर उतरू नये असं ते म्हणाले. तसंच निवडणूक आयोग या प्रकरणाच्या मूळापर्यंत जाईल अशी अपेक्षा करत असल्याचंही ते म्हणाले. "निवडणूक प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो आणि माझे वडिलही माझ्यासोबत आहेत. या संघर्ष असलेल्या निवडणूक मोहिमांमध्ये कोणीही शारीरिक हिंसाचारावर उतरू नये. आम्हाला आशा आहे की निवडणूक आयोग मूळापर्यंत जाऊन या प्रकरणाची चौकशी करेल," असंही अब्दुल्ला म्हणाले.
ममता बॅनर्जींवरील हल्ल्यावर ओमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया; म्हणाले, "आशा करतो की निवडणूक आयोग..."
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 4:47 PM
West Bengal Election : गुरूवारी निवडणूक प्रचारादरम्यान ममता बॅनर्जींच्या पायाला झाली दुखापत, जाणूनबुजून हल्ला केल्याचा ममता बॅनर्जींचा आरोप
ठळक मुद्देगुरूवारी निवडणूक प्रचारादरम्यान ममता बॅनर्जींच्या पायाला झाली दुखापतजाणूनबुजून हल्ला केल्याचा ममता बॅनर्जींचा आरोप