कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये (West Bengal Assembly Election 2021 ) सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (All India Trinamool Congress ) आणि भाजपामधील (BJP) संघर्ष दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होत चालला आहे. दरम्यान, बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) काल हुगळीमध्ये सभा घेत सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर टीका केली होती. दरम्यान, आता पंतप्रधान मोदींची सभा ज्या मैदानावर झाली ते मैदान तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी गंगाजल शिंपडून शुद्ध केले आहे. ( place where Prime Minister Narendra Modi held a rally was cleansed by Trinamool Congress by sprinkling Ganga water)हुगळीमध्ये तृणमूल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप यादव यांच्या पुढाकारामध्ये हे अभियान चालवले गेले. तृणमूलचा आरोप आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येथील सभेमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर चुकीचे आरोप लावले. तसेच यादव यांनी केंद्र सरकारकडून बंगालसोबत दुजाभाव होत असल्याचा आरोपही केला.दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यासुद्धा २४ फेब्रुवारी रोजी याच मैदानावर निवडणुकीच्या सभेला संबोधित करणार आहेत. अशा परिस्थितीत गंगाजल शिंपडून मैदानाचे शुद्धिकरण करून आपण योग्य केले आहे, असे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी येथे जो हॅलिपॅड बांधण्यात आला. त्यासाठी अनेक झाडे तोडण्यात आली, असा आरोप तृणमूलने केला आहे. येथे तीन हॅलीपॅड बांधण्यात आले, त्यासाठी एक शंभर वर्षे जुना वृक्षही तोडण्यात आला, असा दावा तृणमूलने केला आहे.यादरम्यान आता तृणमूल काँग्रेसने हॅलीपॅड असलेल्या जागेवर वृक्षारोपनाचे अभियान सुरू केले आहे. तृणमूलने सांगितले की, भाजपाकडून पर्यावरणाचे नुकसान करण्यात आले, त्याची भरपाई तृणमूलकडून करण्यात येत आहे.
बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जिथे घेतली रॅली, ती जागा तृणमूलने गंगाजल शिंपडून शुद्ध केली
By बाळकृष्ण परब | Published: February 23, 2021 5:31 PM