नरेंद्र मोदींनी 115 योजना आणल्या, पण ममता सरकारमध्ये 115 घोटाळे झाले - अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 05:13 PM2021-03-25T17:13:07+5:302021-03-25T17:23:34+5:30

West bengal Assembly Election 2021 : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

West Bengal Polls: 'Didi's 115 scams vs PM Modi's 115 schemes': Amit Shah goes all out against Mamata Banerjee | नरेंद्र मोदींनी 115 योजना आणल्या, पण ममता सरकारमध्ये 115 घोटाळे झाले - अमित शाह

नरेंद्र मोदींनी 115 योजना आणल्या, पण ममता सरकारमध्ये 115 घोटाळे झाले - अमित शाह

Next
ठळक मुद्देराज्यात भाजपा सरकार सत्तेत आल्यास 18 हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठविले जातील, असे आश्वासन अमित शहा यांनी दिले.

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी (West bengal Assembly Election 2021) अजून काही दिवस शिल्लक आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस सरकारवर हल्लाबोल केला आहे. बंगालच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 115 योजना आणल्या, तर ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये 115 घोटाळे झाले, असे म्हणत अमित शाह यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. (West Bengal Polls : 'Didi's 115 scams vs PM Modi's 115 schemes': Amit Shah goes all out against Mamata Banerjee)

राज्यातील पुरुलिया जिल्ह्यात आयोजित रॅलीत अमित शाह बोलत होते. यावेळी ममता दीदी तुम्हाला फ्लोराइडयुक्त पाणी देते. एकदा तुम्ही दीदीला सत्तेबाहेर जाण्याचा मार्ग दाखवा, त्यानंतर भाजपा सरकार तुम्हाला 10 हजार कोटी रुपये खर्च करुन तुम्हाला शुद्ध पिण्याचे पाणी देईल, असे अमित शाह यांनी सांगितले. तसेच, कम्युनिस्टांनी येथे उद्योग सुरू होऊ दिले नाहीत. यानंतर दीदींनी उद्योगांनाही बाहेर ठेवले. तृणमूल काँग्रेस असो किंवा कम्युनिस्ट कोणीही रोजगार देऊ शकत नाही. तुम्हाला रोजगार हवा असेल तर एनडीए सरकारला मतदान करावेच लागेल, असे अमित शाह म्हणाले.

शेतकऱ्यांच्या खात्यात थेट १८ हजार रुपये पाठविले जातील
पंतप्रधान मोदींनी राज्याच्या विकासासाठी ११५ योजना आणल्या. मात्र, त्यांना राज्यात राबविण्यात आल्या नाहीत. यादरम्यान, ममता सरकारमध्ये 115 घोटाळे झाले. राज्यात भाजपा सरकार सत्तेत आल्यास 18 हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठविले जातील, असे आश्वासन अमित शाह यांनी दिले.

आदिवासींच्या हितासाठी एक बोर्ड स्थापण करण्याचा निर्णय
अमित शाह यांनी राज्यातील आदिवासींच्या हिताबद्दलही भाष्य केले आहे. ते म्हणाले की आदिवासींच्या हितासाठी आम्ही एक बोर्ड स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यतिरिक्त सार्वजनिक क्षेत्रातील महिलांसाठी 33 टक्के आरक्षण दिले जाईल. याशिवाय, राज्यभर महिलांसाठी सार्वजनिक वाहतूक मोफत करण्यात येणार आहे, असे अमित शाह यांनी म्हटले आहे.

Web Title: West Bengal Polls: 'Didi's 115 scams vs PM Modi's 115 schemes': Amit Shah goes all out against Mamata Banerjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.