मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत त्यांनी संरक्षणमंत्री असताना चीनचा केलेला दौरा कसा घडला हे सांगितलं, आपल्याला पाकिस्तानची फारशी चिंता करायची गरज नाही, खरी चिंता चीनचीच आहे अशी भीती शरद पवारांनी व्यक्त यांनी व्यक्त केली.
या मुलाखतीत शरद पवार म्हणाले की, मी संरक्षणमंत्री असताना चीनला गेलो होतो, त्यावेळी डिफेन्स सेक्रेटरी व्होरा हेही सोबत होते, आपलं सैन्य हिमालयीन बॉर्डरवर तैनात होतं, चीनचेही सैन्य होते, हिमालयीन बॉर्डरवर सैन्य ठेवणे अत्यंत खर्चिक होते, हवामानाच्या दृष्टीने जवानांसाठी त्रासदायक होते, बर्फ वैगेर नैसर्गित बाबींचा विचार करता ते कठीणचं होतं, या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांनी सात दिवसांच्या चर्चेत सैन्य मागे घेण्यावर एकमत केले. त्या करारा ड्राफ्ट तयार केला तो पंतप्रधान नरसिंह रावांकडे पाठवला, त्यांनी मसुद्याला मान्यता दिली, त्यानंतर चीनच्या संरक्षणमंत्र्यांनी त्यांच्या पंतप्रधानांना ड्राफ्ट दाखवण्यासाठी तुम्ही सोबत चला असं म्हटलं, पंतप्रधान विश्रांतीला एकेठिकाणी गेले आहेत असं त्यांनी सांगितले पण कुठे गेलेत ही जागा सांगितली नाही. सकाळी ७ वाजता तयार राहा असं त्यांनी सांगितले.(Sharad Pawar Interview With Sanjay Raut)
त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ७ ला डिफेन्सच्या विमानात बसलो, जाईपर्यंत त्यांनी कुठे चाललोय हे सांगितले नाही. तीन तासांनी प्लेन एका ठिकाणी उतरले, तो सागरी किनाऱ्याचा प्रदेश होता, तिथे अजिबात लोकसंख्या नव्हती. जिथे विमान उतरले तिथे चांगले बंगले होते, शेवटी मी विचारलं कुठे आलोय आपण? त्यावर त्यांनी सांगितले की, कम्युनिस्ट पार्टीच्या पॉलिट ब्युरोचे जे मेंबर आहेत त्यांच्या विश्रांतीसाठी हा सगळा परिसर आहे. इथं बाकी लोकसंख्या नाही. याचठिकाणी पंतप्रधान होते, साधारणत: ११ च्या वाजेपर्यंत हे सगळं उरकलं. नंतर त्यांनी आम्हाला १ वाजता जेवायला बोलावलं होतं, साडेअकरानंतर चर्चा संपली आम्ही मोकळे झालो, त्यानंतर १ पर्यंत वेळ कसा घालवायचा असा विचार मी करत होतो, तेवढ्यात त्यांच्या पंतप्रधानांनी सुचवलं लेट्स वॉक! असं शरद पवारांनी सांगितले.(India-China FaceOff)
समुद्रकिनारी आपण चालूया, छान सागरी किनारा आहे, मी मनात म्हटलं की, ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. यानिमित्त त्यांच्याशी बोलता येईल. मग आम्ही त्या किनाऱ्यावर चालत होतो, तास-सव्वा तास मी अनेक प्रश्न त्यांना विचारत होतो, तेव्हा त्यांनी सांगितलं की, माझं सगळं टार्गेट अमेरिका आणि जपान आहे. ही ३० वर्षापूर्वीची गोष्ट आहे. चीनचा जगाची आर्थिक महासत्ता बनवायची आहे असं ते वारंवार सांगत होते, अमेरिकेच्या तोडीस तोड चीन उभा राहू शकतो, चीन अमेरिकेच्या पुढे जाऊ शकतो हे मला दाखवायचे आहे असं ते सांगत होते, ते अभिमानाने हे सगळं सांगत होते, ही सगळी चर्चा झाल्यावर मी सहज त्यांना विचारलं, तुमच्या शेजारी देशांबद्दल काय धोरण राहणार? तर ते हसले, म्हणाले, आमचं टार्गेट अमेरिका आणि जपान आहे, शेजारी राष्ट्रांचा तूर्त आम्ही विचार करत नाही, बघू पाच-पंचवीस वर्षांनी विचार करु, हे ऐकताच माझ्या डोक्यात आलं, उद्या भारतासमोर संकट आलं तर ते आज नाही तर पंचवीस-तीस वर्षांनी येईल, या भेटीचा किस्सा शरद पवारांनी मुलाखतीत सांगितला आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
पाकिस्तान नव्हे तर चीन आपला शत्रू; शरद पवारांनी ठामपणे सांगितलं कारण...
राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधील आणखी एक नेता भाजपाच्या गळाला?; काँग्रेस सरकार अडचणीत
सहामाही परीक्षेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पास की नापास?; शरद पवारांनी सांगितला निकाल
शरद पवारांकडून नरेंद्र मोदींच्या ‘त्या’ वक्तव्याचा समाचार; राजकारणात कुणी कुणाचाच गुरु नसतो, तर...
पाहा व्हिडीओ