Maharashtra Latest News: लोकसभा निवडणुकीत व्होट जिहाद करण्यात आला, अशी टीका भाजपा नेत्यांकडून केली जात आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली असून, आयोगाने चौकशी करून कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यावर आता भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आकडेवारी मांडत सवाल उपस्थित केला आहे.
किरीट सोमय्यांनी काही मतदारसंघातील आकडेवारी पोस्ट केली आहे. त्या आकडेवारीवर बोट ठेवत किरीट सोमय्यांनी हे कुठून आले? असा सवाल केला आहे.
किरीट सोमय्यांचे म्हणणे काय?
"निवडणूक आयोगाने सांगितले मुंबईत गेल्या पाच वर्षात 5% मतदार वाढले. त्यात मालाड मालवणी येथे 22.34% आणि चांदिवली येथे 20.47% मतदार वाढले, हे कुठून आले? लोकसभा निवडणुकीत मालेगाव विधानसभेत 178 बूथमध्ये कॉंग्रेसला 99,053 मते मिळाली, भाजपला फक्त 596 मते मिळाली, याला काय म्हणायचं?", असा सवाल किरीट सोमय्यांनी व्होट जिहादच्या मुद्द्यावर बोलताना केला आहे.
निवडणूक आयोगाने काय म्हटलेलं आहे?
पत्रकार परिषदेत बोलताना आयोगाचे अधिकारी कुलकर्णी म्हणालेले, "आपल्याकडे अभिव्यक्ती आणि भाषण स्वातंत्र्य आहे. कोणी आपले मते मांडणे, वैयक्तिक किंवा जाहीरपणे या सगळ्याबद्दल आपला कायद्यात काही ना काही म्हटलेलं आहे. कायद्याच्या बाहेर जाणारं विधान कुणी करत असेल, तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल."
"आपण जो प्रश्न विचारला की अमूक हे (व्होट जिहाद शब्द) कायद्याच्या बाहेर जाणार आहे की नाही. याचं उत्तर नक्की काय झालेलं आहे? पुरावे काय आहेत? याच्यावर अवलंबून आहे. आणि कायद्याच्या चौकटीतच हे सिद्ध व्हावं लागतं", असे आयोगाचे अधिकारी म्हणाले आहेत.