शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

दक्षिण गोव्यातील हिंदूबहुल 13 मतदारसंघांतील वाढीव टक्का कुणाच्या फायद्याचा?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 7:55 AM

- सुशांत कुंकळयेकर मडगाव: कॅथोलिकबहुल सासष्टीत यावेळी प्रथमच मतदान 1.63 लाखावर पोहोचल्याने काँग्रेसच्या गोटात खुशीची गाजरे चघळली जात असली ...

- सुशांत कुंकळयेकर

मडगाव: कॅथोलिकबहुल सासष्टीत यावेळी प्रथमच मतदान 1.63 लाखावर पोहोचल्याने काँग्रेसच्या गोटात खुशीची गाजरे चघळली जात असली तरी प्रत्यक्षात सासष्टीतील सहा आणि मुरगावातील एक अशा एकूण सात कॅथोलिकबहुल मतदारसंघात यंदा झालेले मतदान केवळ 68.40 टक्के एवढेच असून, त्यामानाने इतर 13 हिंदूबहुल मतदारसंघात झालेले मतदान 75.48 टक्के असल्याने हे 13 मतदारसंघ कुणाबरोबर आहेत, त्याच पक्षाची दक्षिण गोव्यात सरशी होणार आहे. त्यामुळे भाजपाच्या गोटातही तसे खुशीचेच वातावरण दिसते.2014च्या तुलनेत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यातील मतांची टक्केवारी दोन टक्क्यांनी उतरली असली तरी हिंदू बहुसंख्य मते असलेल्या शिरोड्यात यावेळी ही टक्केवारी चारने वाढली असून, मडगावातही एका टक्क्याची वाढ झाली आहे. फातोडर्य़ात मागच्याएवढेच म्हणजे 73.6 टक्के मतदान झाले आहे. याउलट कॅथोलिक मतदारांची अधिक भरणा असलेल्या कुठ्ठाळीतील मतदार यावेळी तब्बल सात टक्क्यांनी कमी झाले आहेत. त्याशिवाय बाणावली, नावेली व नुवे या तीन मतदारसंघात प्रत्येकी तीन टक्क्यांनी, कुंकळ्ळीत दोन टक्क्यांनी तर कुडतरी व वेळ्ळी येथील टक्केवारी एक टक्क्याने कमी झाली आहे.हिंदूबहुल मतदारसंघापैकी मडकईतील मतदान यावेळी 6 टक्क्यांनी कमी झाले तर काणकोणातील मतदार 4 टक्क्यांनी कमी झाले आहे. पण ही गोष्ट भाजपाच्या पथ्यावर पडणारीच आहे. कारण यावेळी मडकईत मगोचे सुदिन ढवळीकर यांनी काँग्रेसच्या बाजूने जोर लावला होता तर काणकोण हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहे. सांगेतही मतदान तीन टक्क्यांनी कमी झाले असले तरी हाही मतदारसंघ अपक्ष आमदाराकडे आहे. त्या तुलनेत वास्को येथे 5 टक्क्यांनी आणि मुरगावात 4 टक्क्यांनी कमी झालेले मतदान भाजपाची थोडी चिंता वाढवू शकते.

काँग्रेसच्या वाटेत आपची अडचणसासष्टीत यंदा 1.63 लाख एवढे मतदान झाले असले तरी आम आदमी पक्षाची रिंगणातील उपस्थिती काँग्रेसची चिंता वाढवू शकणारी आहे. आपने सासष्टीत 25 हजारांच्या आसपास मते घेतली तर काँग्रेस निश्चितच डेंजर झोनमध्ये जाईल, अशी प्रतिक्रिया राजकीय विश्लेषक ऍड. क्लिओफात कुतिन्हो यांनी व्यक्त केली. आपचे गोव्याचे निमंत्रक आणि दक्षिण गोव्याचे उमेदवार एल्वीस गोमीस यांनी, काँग्रेसने आताच जल्लोष करू नये. 23 मे पर्यंत वाट पहावी अशा सूचक शद्बात आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना नुवे, बाणावली, कुंकळ्ळी व वेळ्ळी या चार मतदारसंघांसह कुडतरीतही आपला चांगल्या प्रमाणात मते पडतील, अशी आशा व्यक्त केली. खाण पट्टय़ांतही आप चांगली कामगिरी करेल, असा विश्वास आपचे सिद्धार्थ कारापुरकर यांनी व्यक्त केला.

सावर्डेतील आघाडी कायम ठेवू: पाऊसकरसावर्डे मतदारसंघात 2014 च्या निवडणुकीत भाजपाला 12 हजार मतांची आघाडी मिळाली होती. ही आघाडी यावेळीही आम्ही कायम ठेवू असा विश्वास सावर्डेचे सरपंच संदीप पाऊसकर यांनी व्यक्त केली. यावेळी सावर्डेत दोन टक्के मतदान कमी झाले आहे त्याचे कारण खाण व्यवसायाच्या निमित्त गोव्याबाहेरील जे मतदार या भागात वास्तव करुन होते ते परत गावात गेल्याने टक्केवारी कमी झाल्याचे दिसते. मात्र जवळपास सर्व स्थानिक मतदारांनी यावेळी मतदान केले असून ते भाजपाच्याच बाजूने जास्त प्रमाणात झाले आहे असे ते म्हणाले.

कुडचडेत भाजपाला किमान सात हजारांची आघाडीकुडचडे मतदारसंघातून यावेळी भाजपाला किमान सात हजार मतांची आघाडी मिळेल. ही आघाडी मागच्या आघाडीपेक्षा अधिकच असेल असे मत कुडचडेचे आमदार व वीजमंत्री निलेश काब्राल यांनी व्यक्त केले. या निवडणुकीत काब्राल यांच्याकडे कुडचडे व सावर्डे या दोन मतारसंघाची जबाबदारी दिली होती. या दोन्ही मतदारसंघात भाजपा चांगली कामगिरी करेल असे मत त्यांनी व्यक्त केले. केपेतही भाजपा 2014 प्रमाणोच आघाडी घेईल असे मत भाजपाचे युवा कार्यकर्ते योगेश कुंकळयेकर यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, केपे नगरपालिका क्षेत्र हे प्रत्येकवेळी काँग्रेसच्या बरोबर असते. तर बाकीचे पंचायत क्षेत्र भाजपाबरोबर असते. यावेळी नगरपालिका क्षेत्रतून कमी मतदान झालेले असून त्याउलट पंचायत क्षेत्रत मतदान वाढले आहे याचा फायदा भाजपाला होऊ शकेल.