विनेश फोगाट यांच्या विरोधात भाजपचा उमेदवार ठरला! कोण आहेत कॅप्टन योगेश बैरागी?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 04:53 PM2024-09-10T16:53:08+5:302024-09-10T16:55:31+5:30

Vinesh Phogat vs Yogesh Bairagi : जुलाना विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने कुस्तीपटू विनेश फोगाट यांना उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात आता भाजपने उमेदवार जाहीर केला आहे. कॅप्टन योगेश बैरागी यांना तिकीट देण्यात आले आहे. 

Who is Captain Yogesh Bairagi, BJP candidate against Vinesh Phogat | विनेश फोगाट यांच्या विरोधात भाजपचा उमेदवार ठरला! कोण आहेत कॅप्टन योगेश बैरागी?

विनेश फोगाट यांच्या विरोधात भाजपचा उमेदवार ठरला! कोण आहेत कॅप्टन योगेश बैरागी?

Vinesh Phogat vs Yogesh Bairagi, Julana Assembly Election 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीत जुलाना विधानसभा मतदारसंघाची देशभरात चर्चा आहे. काँग्रेसने या मतदारसंघातून कुस्तीपटू विनेश फोगाट यांना निवडणुकीच्या आखड्यात उतरवले आहे. विनेश फोगाट यांच्याविरोधात भाजप कुणाला रिंगणात उतरवणार याकडे सगळ्यांचे लक्ष होते. अखेर भाजपने आपला उमदेवार जाहीर केला असून, कॅप्टन योगेश बैरागी यांना तिकीट दिले आहे. ते कोण आहेत, जाणून घ्या.

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी यादी जाहीर केली. या यादीत कॅप्टन योगेश बैरागी यांच्या नावाचाही समावेश आहे. या घोषणेबरोबर कॅप्टन योगेश बैरागी हे जुलानातून विनेश फोगाट यांच्याविरोधात निवडणूक लढवणार, हे निश्चित झाले. महत्त्वाचे म्हणजे योगेश बैरागी हे आधीपासूनच राजकारणात सक्रिय आहेत. 

कोण आहेत कॅप्टन योगेश बैरागी?

३५ वर्षीय कॅप्टन योगेश बैरागी हे हरियाणातील जिंद जिल्ह्यातील सफिडोन गावचे रहिवाशी आहेत. ते सध्या हरियाणा भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आहेत. कॅप्टन योगेश बैरागी हे एअर इंडियामध्ये पायलट आहेत. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी सीनियर पायलट म्हणून काम केले आहे. 

चेन्नईमध्ये पुरपरिस्थिती निर्माण झाली, त्यावेळी मदत कार्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. कोरोना काळा वंदे भारत मिशनमध्येही त्याचा मौलाचा सहभाग होता. वंदे भारत मिशन नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 

आजूबाजूच्या गावखेड्यात तरुणांना भेडसावत असलेला बेरोजगारीचा प्रश्न आणि इतर स्थानिक विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. सध्या भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष म्हणून काम करत असतानाच पक्षाने त्यांना विनेश फोगाट यांच्याविरोधात उमेवदारी दिली.

Web Title: Who is Captain Yogesh Bairagi, BJP candidate against Vinesh Phogat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.