मुंबई – भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी एका पीडित महिलेला माध्यमांसमोर आणलं, या महिलेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या परभणीतील नेत्यावर बलात्काराचे गंभीर आरोप लावले आहेत, माझ्याकडे व्हॉट्सअप चॅटसह अनेक पुरावे असून पोलीस या नेत्यावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केली आहे.
या महिलेने परभणीतील राष्ट्रवादी नेते राजेश विटेकर यांच्यावर आरोप केले आहेत, शरद पवार(Sharad Pawar) यांच्या निकटवर्तीय असलेले राजेश विटेकर(NCP Rajesh Vitekar) यांनी माझ्यासोबत अत्याचार केले, त्यांची आई विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून माझ्यावर वारंवार खोटे आरोप करण्यात येत आहे, गृहखातं आमचं आहे, सत्ता आमची आहे, माझ्याविरोधात गुन्हा दाखल करू शकणार नाही. बंदुकीचा धाक दाखवून, लग्नाचं अमिष दाखवून माझ्यावर बलात्कार आणि लैंगिक शोषण केले. गेल्या वर्षभरापासून मी या अत्याचाराविरोधात पोलीस स्टेशनला गेले, परंतु कोणीही माझ्या तक्रारीची दखल घेतली नाही. उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली. शरद पवार साहेब मला मुलगा मानतात, ते माझ्यावर गुन्हा दाखल होऊ देणार नाहीत असं विटेकरांनी धमकावण्यात आलं असल्याचं आरोप या महिलेने केला आहे.
“मी शरद पवारांचा मानस पुत्र, माझं कुणीही...”; राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्यावर बलात्काराचा आरोप
कोण आहेत राजेश विटेकर ?
२०१९ मध्ये राजेश विटेकर हे महाआघाडीचे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार होते
राजेश विटेकर यांच्या आई निर्मला उत्तमराव विटेकर या परभणी जिल्हा परिषदेच्या विद्ममान अध्यक्षा आहेत.
राजेश विटेकर सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहे.
परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहे.
परभणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहे.
श्री छत्रपती शिवाजी महाराज शिक्षक प्रसारक मंडळ, सोनपेठचे सचिव आहेत.
आरोप करणारी महिला कोण?
राजेश विटेकरांची संस्था असणाऱ्या शाळेवर ही महिला शिक्षिका म्हणून कार्यरत होती.
काम समाधानकारक नसल्याने या महिलेला कामावरून काढून टाकलं होतं
सध्या हे प्रकरण औरंगाबाद हायकोर्टात न्यायप्रविष्ट आहे.
१५ मार्च २०२१ या महिलेवर परभणीतील सोनपेठ पोलीस ठाण्यात ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.