शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

उमेदवार कोण, यावर सगळे गणित, सेना-भाजपाचे काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 6:25 AM

बिहारचे तत्कालीन राज्यपाल रा.सू. गवई यासारख्या दिग्गजांनी एकेकाळी प्रतिनिधित्व केलेल्या मतदारसंघात यावेळी होणारी लढतही चमकदार असेल.

- गणेश देशमुखऐतिहासिक राजकीय पार्श्वभूमी लाभलेला अन् अनुसूचित प्रवर्गांसाठी राखीव असलेला अमरावती लोकसभा मतदारसंघ हा देशभरातील चर्चित मतदारसंघांपैकी एक. श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे जनक डॉ.पंजाबराव देशमुख, देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंग पाटील, केरळ, बिहारचे तत्कालीन राज्यपाल रा.सू. गवई यासारख्या दिग्गजांनी एकेकाळी प्रतिनिधित्व केलेल्या या मतदारसंघात यावेळी होणारी लढतही चमकदार असेल.लोकसभेतील शिवसेनेचे गटनेता आनंदराव अडसूळ हे या मतदारसंघातून दुसऱ्यांदा प्रतिनिधीत्व करीत आहेत. पूर्वाश्रमीच्या दाक्षिणात्य अभिनेत्री आणि अपक्ष आमदार रवि राणा यांच्या सौभाग्यवती नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांना यापूर्वीच्या निवडणुकीत तगडे आव्हान दिले होते.हा मतदारसंघ अडसुळांचा असला तरी अडसूळ मात्र अमरावतीचे नाहीत. सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात अडसूळ हे बुलडाणा मतदारसंघातून २००९च्या निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघात पोहोचले. तत्पूर्वी ते बुलडाण्याचे खासदार होते. राखीव आणि सुरक्षित मतदारसंघ हे अडसूळ यांच्या राजकारणातील अग्रणी सूत्र. त्यामुळे आनंदराव अडसुळांनी यावेळी पुन्हा मतदारसंघ बदलल्यास आश्चर्य वाटू नये.अद्याप युतीची अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांतील इच्छुक प्रतिस्पर्ध्यांप्रमाणे वावरत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा घरोबा जमला असला तरी अमरावतीची जागा कुणाला, हे अधिकृतपणे जाहीर झाले नसल्याने दोन्ही पक्षांमध्ये दाव्यांचे राजकारण रंगले आहे. एकंदरीत सर्वच पक्षांमधील इच्छुकांच्या उत्साहाला उधाण आले आहे.काँग्रेसचे किशोर बोरकर, भाजपच्या सीमा सावळे, राष्ट्रवादीचे दिनेश बूब देव पाण्यात ठेऊन आहेत. रा.सू. गवर्इंचे पुत्र आणि रिपाइंचे प्रमुख राजेंद्र गवई यांनी स्वत:ची उमेदवारी घोषित केली आहे. तर नवनीत राणा या कुठले तिकीट घेणार? याविषयी उत्सुकता आहे.'लोकमत'कडे असलेल्या विश्वसनीय माहितीनुसार, नवनीत या राष्ट्रवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवतील.भाजप-शिवसेनेची युतीझाल्यास सेनेचे आनंदराव अडसूळ यांचा दावा पहिला असेल.मतदारसंघ भाजपच्या वाट्याला दिला गेलाच तर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माजी स्थायी सभापती सीमा सावळे या उमेदवार असतील. त्यामुळे उमेदवार कोण असतील, यावरच या मतदारसंघाचेराजकीय गणित अवलंबून असेल. ते सारे युती होणे न होणे यावर अवलंबून आहे.>सध्याची परिस्थितीखासदार आनंदराव अडसूळ हे त्यांचे पायलट असलेले पुत्र दर्यापूरचे माजी आमदार अभिजित यांना लोकसभेच्या मैदानात उतरवून अनपेक्षित धक्का देऊ शकतात. संत्र्यामुळे श्रीमंती अनुभवलेला हा मतदारसंघ संत्राबागा वाळल्यामुळे भीषण आर्थिक अडचणीत आला. खासदारांच्या दोन टर्ममध्ये संत्र्यासाठी वेगळे काहीच केले गेले नाही. सेवानिवृत्त लोकांचे शहर असा परिचय आता अमरावतीचा द्यावा लागतो. निवृत्त लोक शहरात वास्तव्याला येतात. शहरात निर्माण झालेले अभियंते, डॉक्टर्स इतरत्र निघून जातात.अचलपूर जिल्हा निर्मिती, मेळघाट, पर्यटन, पाणीटंचाई, खारपाणपट्टा, विमानसेवा, तूर, कापूस, महापालिका अकार्यक्षमतेसंबंधीच्या समस्या निवारणासाठी हे सरकारही अपयशी ठरले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Anandrao Adsulआनंदराव अडसूळ