ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघात मागील सहा लोकसभा निवडणुकींचा विचार केल्यास या निवडणुकांमध्ये रेकॉर्डब्रेक मताधिक्य २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आले. शिवसेनेचे राजन विचारे हे दोन लाख ८१ हजार २९९ मताधिक्याने निवडून आले होते. त्यांचे हे रेकॉर्ड मागील कित्येक वर्षांत कोणाच्याही नावावर नाही. त्यामुळे या निवडणुकीत कितीचे मताधिक्य मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मागील निवडणुकीत २० लाख ७३ हजार २५१ मतदारांपैकी १० लाख ५४ हजार ५७५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ५०.८७ टक्के मतदानाची नोंद झाली होती. मोदीलाटेमुळे विचारे यांचे मताधिक्य वाढले होते.
पावणेतीन लाखांचे मताधिक्य कोण तोडेल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 01:20 IST