कुणाचं सरकार येईल, कोण पंतप्रधान होईल ; ज्योतिष्यांनी वर्तवलं भविष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 06:37 PM2019-05-07T18:37:43+5:302019-05-07T18:42:26+5:30

ग्रहस्थिती पाहता लोकसभा निवडणुकीनंतर पूर्ण भाजपला बहुमत मिळाले नाही तरी घटक पक्षांची मदत घेऊन मोदी सरकार येईल ' असे  भाकीत ज्योतिष तज्ज्ञांनी पुण्यात केले आहे. '

Who will come to the government, who will be the prime minister; Astrologers Conducted Future | कुणाचं सरकार येईल, कोण पंतप्रधान होईल ; ज्योतिष्यांनी वर्तवलं भविष्य

कुणाचं सरकार येईल, कोण पंतप्रधान होईल ; ज्योतिष्यांनी वर्तवलं भविष्य

Next

पुणे : ग्रहस्थिती पाहता लोकसभा निवडणुकीनंतर पूर्ण भाजपला बहुमत मिळाले नाही तरी घटक पक्षांची मदत घेऊन मोदी सरकार येईल ' असे  भाकीत ज्योतिष तज्ज्ञांनी पुण्यात केले आहे. 'ज्योतिष विद्या प्रसारक मंडळ ' आयोजित ' मे महिन्यातील ग्रहमान आणि लोकसभा निवडणूक निकाल ' या विषयावरील व्याख्यानात ज्योतिष विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि 'ज्योतिष ज्ञान 'मासिकाचे संपादक सिध्देश्वर मारटकर बोलत होते. 

नरेंद्र मोदी :

'देशाच्या पत्रिकेत  राहू - मंगळ योग फारसा चांगला नाही. मोदींना निवडणुकीचा  शेवटचा टप्पा चांगला नाही. धनू राशीतील नवपंचम योगामुळे सत्ताधारी भाजपला पुन्हा सत्तास्थापनेची संधी मिळू शकते . गुरु ग्रह हा सत्ता टिकवायला उपयोगी पडेल.परंतु ,रवी -शनी षडाष्टक योगामुळे भाजपला पूर्ण बहुमत मिळणे कठीण आहे ,घटक पक्षांची मदत घ्यावी लागेल . भाजपच्या राशीनुसार दशमेश गुरु लाभाचा आहे. सत्ता टिकू शकते.

राहुल गांधी :

राहु, मंगळ भ्रमण राहुल गांधींना लाभाचे नाही. तरी काँग्रेस, राहुल यांची पत्रिका चांगली असल्याने १०० च्या आसपास जागा मिळतील.विरोधी पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करणार, मात्र ,गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली तरी भाजपची सत्ता येईल.चतुर्थेश शनी तृतीयस्थानी केतू -प्लूटो बरोबर असल्याने विरोधी पक्षासाठी बहुमत अवघड आहे . राशी स्वामी मंगळ अष्टमात गेल्याने राहुल यांना  सत्ता मिळणार नाही. काँग्रेसला पंतप्रधानपद मिळणार नाही,,असे दिसते. मिथुन -रवीची पत्रिका असलेल्या राहुल गांधींना काही काळ धनू राशीत होणारे गुरुचे भ्रमण अनुकूल असल्याने काँग्रेसच्या जागा वाढतील . पण ,रवीसमोरून होणारे राहूचे भ्रमण त्यांना पंतप्रधानपदाचा योग नाही,असे दिसते . प्रियांका यांच्या धनु राशीत रवी आहे. त्यात गुरुचे भ्रमण असल्याने त्यांचा प्रभाव वाढला. त्या राहुल यांना मागे टाकून पुढे जातील. आता प्लूटोचे भ्रमण भाजपसाठी महत्वाची ठरेल.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नरेंद्र मोदी :

रा . स्व . संघाच्या कन्या -रवीच्या पत्रिकेनुसार दशमस्थानी अनेक ग्रह असल्याने भाजपला  बळ मिळेल. रवी पत्रिकेच्या भाजपला  दशमेश गुरुचे भ्रमण दशमातून असल्याने ,प्लूटो दशमात असल्याने यश मिळू शकते . रवी कुंडलीच्या नरेंद्र मोदी यांना चतुर्थातून होणारे गुरुचे भ्रमण सत्ता मिळविण्यासाठी उपयुक्त ठरू शकते . २०२२ नंतर मंदी, बेरोजगारीचे प्रश्न पुढे येतील. मोदींना त्यावेळी अपयश स्वीकारावे लागेल. मोठे संक्रमण त्यावेळी होऊ शकते. मकरेचा शनी, मकरेचा प्लूटो बदल घडवेल. हर्षल चा प्रभाव २०२० नंतर दिसेल. तेव्हा प्रियांका गांधींचा प्रभाव वाढेल.मकर रास ही सेवेची असल्याने मोदींच्या बोलण्यात सेवक, चौकीदार शब्द येतात, असेही मारटकर यांनी सांगितले.

शरद पवार :

शरद पवार यांच्या पत्रिकेत वृश्चिक राशीतील रवीकडून शनी धन स्थानातून भ्रमण करीत असल्याने , आठव्या स्थानात राहू - मंगळ आहे.त्यामुळे ते पंतप्रधान होणे कठीण दिसते  . मायावती यांच्या जागा वाढतील, शनी बारावा असल्याने त्या पंतप्रधान होणार नाहीत.

शिवसेना :

रवी शुभयोगात असल्याने शिवसेनेच्या एक -दोन जागा कमी झाल्या तरी प्रभाव राहील.छोट्या पक्षांची भूमिका महत्वाची राहील. त्यांची मदत घेतल्याशिवाय सत्ता येणार नाही.

नितीन गडकरी :

वृषभ राशीच्या नितीन गडकरीना २०२२ मध्ये चांगली परिस्थिती आहे.

( ही सर्व मारटकर यांची वैयक्तिक मते असून लोकमत त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)

Web Title: Who will come to the government, who will be the prime minister; Astrologers Conducted Future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.