शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

फार्मा कंपनीच्या मालकाला सोडवायला विरोधी पक्षनेते का गेले? नवाब मलिकांनी पुन्हा गंभीर आरोप केले 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 1:01 PM

Remdesivir News : पोलिसांनी चौकशीसाठा बोलावलेल्या या फार्मा कंपनीच्या मालकाच्या बचावासाठी विरोधी पक्षनेते का गेले होते, असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत.

मुंबई - कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी वापरण्यात येत असलेल्या रेमडेसिविरवरून (Remdesivir News) सध्या राज्यातील राजकारणामध्ये मोठा वाद रंगला आहे. त्यातच काल रात्री एका फार्मा कंपनीच्या मालकाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्याने त्यावरून भाजपा (BJP) आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची जुगलबंदी रंगली आहे. (Coronavirus in Maharashtra ) दरम्यान, पोलिसांनी चौकशीसाठा बोलावलेल्या या फार्मा कंपनीच्या मालकाच्या बचावासाठी विरोधी पक्षनेते का गेले होते, असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. (Why did the Leader of the Opposition go to rescue the pharma company owner? Nawab Malik again made serious allegations on BJP)

नवाब मलिक म्हणाले की, काल रात्री औषधांचा साठा आहे अशी खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी राजेश डोकानिया यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र ही बाब समजताच विधानसभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर आमदार प्रसाद लाड आणि आमदार पराग अळवणी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना जर माहिती मिळाली तर ते तपास करतात. मग राजेश डोकानियांना सोडवण्यासाठी राज्यातले दोन दोन विरोधीपक्षनेते आणि दोन  आमदार का गेले होते. काही दिवसांपूर्वी हेच भाजपाचे नेते दीव दमणला गेले होते. रेमडेसिविरचे आम्ही आणून वाटप करू, असे त्यांनी सांगितले होते. भाजपाची लोकं साठा मिळू नये यासाठी प्रयत्न करताहेत का. रेमडेसिविरचा साठा करून स्वत; वाटण्याची किंवा विकण्याची भूमिका घेताहेत, असा आरोपही मलिक यांनी केला.  

दरम्यान, एफडीएने रात्री आदेश दिल्याची माहिती मिळाल्यानंतर राजेश डोकानिया यांना माहिती घेऊन सोडण्यात आलं. तसेच गरज वाटल्यास बोलावले जाईल असे सांगितले. पोलीस हे जनतेसाठी काम करतात. साठा असेल तर जप्त करून जनतेला देण्याचं का काम करते. मग यांना चौकशीसाठी बोलावलं तर भाजपावाले  का घाबरतात. वकिलीसाठी का जातात. देवेंद्रजी वकील आहेत. ते वकीलपत्र घेऊन बाजू मांडत होते की संबंध असल्याने वचाव करत आहेत. महाराष्ट्राच्या हितासाठी पोलीस एफडीए कारवाई करू शकतात. मात्र फार्मा कंपनीच्या मालकाच्या बचावासाठी भाजपाचे नेते का धावून गेले, याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे. याच्यामागचं काय राजकारण आहे भाजपाने स्पष्ट करावं, असे आव्हानही मलिक यांनी दिले.  देशात सात कंपन्यांना वितरण वितरण आणि विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. त्यातील दोन कंपन्यांना परदेशात विक्रीची करण्याचा अधिकार देण्यात आले आहे. तर सतरा कंपन्यांना उत्पादनाची परवानगी आहे. ते उत्पादन करून या दोन कंपन्याना देऊ शकतात. या सात कंपन्यांना स्वत: उत्पादनाची परवानगी आहे. निर्यातबंदी झाल्यानंतर काही कंपन्या आमच्याकडे साठा उपलब्ध आहे. आम्हाला विक्रीसाठी परवानगी द्या म्हणून महाराष्ट्र सरकारकडे परवानगी मागितली होती. त्यासाठी ब्रुक फार्माचे राजेश डोकानिया हे दरेकरांसोबत शिंगणेंना भेटले होते. परवानगी मिळाल्यास रेमडेसिविर देऊ शकतो, अशी माहिती त्यांनी दिली होती, असेही मलिक यांनी यावेली सांगितले. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसnawab malikनवाब मलिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPraveen Darekarप्रवीण दरेकर