- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलवावी लागली. अर्थात, काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे अशी बैठक बोलविण्यासाठी तयारी करत होते मात्र, विरोधी पक्षांचे वरिष्ठ नेते यात सहभाग घेतील की नाही, या विचारात सोनिया गांधी यांनी बैठक बोलविण्याचा निर्णय घेतला.
अधिवेशनादरम्यान राहुल गांधी यांनी विरोधकांच्या बैठका बोलविल्या त्यात विरोधी पक्षांचे मोठे नेते सहभागी झाले नाहीत. भलेही ते शरद पवार असतील की, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी. ममता यांनी सोनिया गांधी यांना सांगितले होते की, राहुल गांधी पद स्वीकारत नाहीत तोपर्यंत विरोधकांना एकत्र करण्याची जबाबदारी तुम्हाला पार पाडावी लागेल.
राहुल गांधी यांनी जबाबदारी घ्यायला हवीज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांचे तर असे म्हणणे होते की, राहुल गांधी यांनी विना पद पक्षनेत्याची भूमिका पार पाडली आहे. संसद अधिवेशनादरम्यान धरणे, निदर्शने याशिवाय सायकल आणि ट्रॅक्टरवर संसदेत पोहचणे, विरोधी पक्षांची बैठक बोलावून रणनीती आखणे यात पुढाकार दाखविला. त्यांचे असे मत आहे की, राहुल गांधी यांनी जबाबदारी स्वीकारायला हवी.