देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालतायेत? काँग्रेस नेत्याचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 04:12 PM2021-03-17T16:12:03+5:302021-03-17T16:13:19+5:30
Congress leader Sachin Sawant : सीडीआर संदर्भातील माहिती तपास यंत्रणांना न देऊन तसेच सीडीआर कोणी दिला हे न सांगून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी घालत आहेत, असा आरोप करत या गुन्ह्यात त्यांनी सहभागी होऊ नये, अशी विनंतीही सचिन सावंत यांनी केली आहे.
मुंबई : अँटिलियासमोरील स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याचे प्रकरण व हिरेन मृत्यू प्रकरणामध्ये भाजपाचे नेते बेफामपणे कोणत्याही पुराव्याशिवाय महाविकास आघाडी सरकारवर आरोप करत आहेत. आता एनआयएने जप्त केलेल्या मर्सिडीस गाडीतून १७ फेब्रुवारी रोजी मनसुख हिरेन यांनी प्रवास केला होता असे म्हटले जाते. सदर गाडीबरोबर एका फोटोत ठाणे भाजपाचा पदाधिकारी दिसत आहे. त्याबद्दल भाजपाने तात्काळ स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. त्याचबरोबर सीडीआर संदर्भातील माहिती तपास यंत्रणांना न देऊन तसेच सीडीआर कोणी दिला हे न सांगून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी घालत आहेत, असा आरोप करत या गुन्ह्यात त्यांनी सहभागी होऊ नये, अशी विनंतीही सचिन सावंत यांनी केली आहे. (Why do Devendra Fadnavis support criminals? Question of Congress leader Sachin Sawant)
हिरेन मृत्यू प्रकरणातून सरकार अस्थिर करण्याचा राजकीय उद्देश साध्य करण्यापायी भाजपा नेते बेफामपणे कोणत्याही पुराव्याशिवाय आरोप करत सुटले आहेत. यातून भाजपा नेत्यांचा बेजबाबदारपणा पूर्णपणे दिसून आला आहे. या प्रकरणातील सीडीआर आपल्याकडे आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात जाहीर केले होते. सीडीआर मिळवणे हा एक अपराध आहे आणि स्वतः वकील तसेच माजी गृहमंत्री राहिलेल्या फडणवीस यांना याची पूर्ण माहिती आहे. परंतु सदर सीडीआर अद्यापही त्यांनी तपास यंत्रणांना दिला नाही. हिरेन प्रकरणातील दोषी पकडण्यासाठी सदर माहितीचा उपयोग झाला असता, असे सांगत यातून दोषीला पाठीशी घालण्याचा त्यांचा उद्देश आहे का?, असा सवाल सचिन सावंत यांनी केला आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयाने १५ मार्च २०२१ रोजी अत्यंत महत्वपूर्ण निकाल दिला. या निकालात न्यायालयाने म्हटले आहे की, एखाद्या आरोपीची वैयक्तिक माहिती त्यामध्ये सीडीआरही आला, न्यायालयाच्या परवानगीशिवाय तिसऱ्या व्यक्तीला कोणाही अधिकाऱ्याने दिली तर त्याला दोषी ठरवलं जाईल. फडणवीसांना ती माहिती कोणी दिली हे न सांगून अशा अपराधी अधिकाऱ्यालाही ते पाठीशी घालत आहेत. त्यामुळे गुन्ह्यामध्ये सहभागी होऊ नका अशी विनंती काँग्रेसतर्फे सचिन सावंत यांनी केली. तसेच १७ फेब्रवारीला मनसुख हिरेन ज्या मर्सिडीस गाडीतून फिरले ती गाडी एनआयएने जप्त केली आहे. सदर गाडीबरोबर ठाणे जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्याचा फोटो आहे. बेछूटपणे आरोप करणाऱ्या भाजपाने या कनेक्शनबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.
मर्सिडीज कारसोबत भाजप नेत्याचा फोटो, सचिन सावंतांचा दावा
या प्रकरणाचा तपास करताना सचिन वाझे यांच्याकडून ‘एनआयए’च्या पथकाने एक मर्सिडीज जप्त केली आहे. मात्र, या गाडीसोबत भाजप (BJP Leader) नेत्याचे संबंध असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin sawant) यांनी केला आहे. मनसुख हिरेन यांची हत्या झाली, त्या दिवशी याच गाडीतून त्यांनी प्रवास केला होता. आता याबद्दल भाजप नेत्यांनी खुलासा करावा, अशी मागणीही सचिन सावंत यांनी केली.
("मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाला नवं वळण, 'त्या' मर्सिडीज कारसोबत भाजप नेत्याचा फोटो!")
Now BJP connection emerges - the Mercedes car allegedly used by Mansukh Hiren on 17th February is seen in a photograph of BJP office bearer of Thane.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 17, 2021
Would @BJP4Maharashtra leaders give explanation? pic.twitter.com/w64FAyfDpi
('ती इनोव्हा गाडी मीच चालवत होतो', सचिन वाझेंनी दिली NIA ला कबुली)