मुंबई: माझ्यावर केवळ आरोप झाले म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितलं. मग आरोप झालेल्या पक्षाच्या इतर मंत्र्यांना तो न्याय का लावला गेला नाही, असा सवाल भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंनी उपस्थित केला. पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप माझ्यावर ठेवण्यात आला. मग अॅक्सिस बँकेत पोलिसांचे पगार वळवले, तो काय पदाचा सदुपयोग होता का? असा प्रश्न खडसेंनी विचारला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पोलिसांचे पगार अॅक्सिस बँकेत वळवण्याचा निर्णय घेतला. देवेंद्र यांच्या पत्नी अमृता फडणवीस अॅक्सिस बँकेत काम करतात. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप झाला होता. तोच मुद्दा खडसेंनी उपस्थित केला.‘नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान’, एकनाथ खडसे पुस्तक लिहिणारअॅक्सिस बँकेत पोलिसांचे पगार वळवण्यात आले. तो काय पदाचा सदुपयोग होता का? पदाचे असे अनेक सदुपयोग मी पाहिले आहेत. माझ्यावर आरोप झाले. त्यामुळे माझा राजीनामा घेतला. पण पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुभाष देशमुख यांच्यासह अनेकांवर झाले होते. त्यांचे राजीनामे घेतले का?, असा सवाल त्यांनी विचारला. भाजपचे पदाधिकारी असलेल्या व्ही. सतीश यांनी मला राजीनामा देण्यास सांगितलं. पत्रकार परिषदेत तुम्ही स्वत: राजीनामा देऊन प्रकरणाच्या चौकशीची मागणी केल्याचं सांगा, अशा सूचना मला करण्यात आल्या. त्यानुसार मी कोऱ्या कागदावर स्वाक्षरी केली, असं खडसेंनी सांगितलं.व्हिडीओ क्लीप, कागदपत्रे उघड केली तर अनेकांना हादरा बसेल; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोटदेवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष कसे झाले, हेदेखील एकनाथ खडसेंनी सांगितलं. 'मी देवेंद्र फडणवीस यांना २००५-२००६ पासून पाहतोय. ते अभ्यासू आणि होतकरू असल्यानं त्यांना मी संधी दिली. अनेकदा विधानसभेत माझ्या ऐवजी त्यांना पुढे केलं. पण आपण ज्यांच्यावर प्रेम केलं, ते पुढे जाऊन असे उतराई होतील असं वाटलं नव्हतं,' अशा शब्दांत खडसेंनी नाराजी व्यक्त केली. खडसेंनी घरातील धुणी रस्त्यावर आणू नये; फडणवीस यांनी सुनावले'सुधीर मुनगंटीवार प्रदेशाध्यक्ष असताना चांगलं काम करत होते. मात्र त्यांचा कार्यकाळ संपत आला. त्यांनाच पुन्हा संधी दिली जावी, असं राज्य भाजपमधील अनेकांना वाटत होतं. त्यावेळी राजनाथ सिंह पक्षाचे अध्यक्ष होते. एकदा गोपीनाथ मुंडे माझ्याकडे आले. देवेंद्र यांना प्रदेशाध्यक्ष करण्याची शिफारस तुम्ही सिंह यांच्याकडे करा, असं मुंडे म्हणाले. गोपीनाथजी माझे नेते होते. मी त्यांचा सन्मान केला. राजनाथ यांना फोन करून मी देवेंद्र यांचं नाव सुचवलं आणि मग देवेंद्र प्रदेशाध्यक्ष झाले,' अशा शब्दांत खडसेंनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला.नाव घेऊन सांगतो, देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून मला त्रास झाला; खडसेंचा थेट हल्लायापूर्वीही केली होती टीकामुख्यमंत्रीपदाचा दावेदार म्हणून माझे नाव समोर आल्याने मला संपविण्याचा प्रयत्न केला. हॅकर मनिष भंगाळे याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रात्री दीड वाजता कशासाठी भेटले असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत तीन दिवस सरकार चालविले आहे. त्यामुळे नैतिकता घालविल्याने ते त्यांच्यावर टिका करूच शकत नसल्याची तोफ त्यांनी डागली होती. मला मंत्री मंडळातून काढले, आमदारकीचे तिकीट नाकारले, याचे मला कोणतेही दु:ख नाही. परंतु विविध खोटे आरोप करून मला बदनाम करण्याचा कट व पक्षांतर्गत आप्तस्वकियांनी केलेले बदनामीचे षडयंत्र जिव्हारी लागले आहे. आतापर्यंत माझ्याकडे या कटकारस्थानाचे पुरावे नव्हते आता पुरावे जमा झाले आहेत. त्यामुळे ते मी जनतेसमोर आणणार आहे, असेही त्यांनी म्हटलं होतं.
दाऊदच्या बायकोला फोन केला हा आरोप तसेच पुण्याची ती जमीन एमआयडीसीची आहे, हा दावा होऊ शकत नाही. एका पाठोपाठ एक आरोप करीत चौकशी लागली. सर्वांना क्लीन चिट मिळाली, पण माझा छळ सुरुच राहिला. निवृत्त न्यायाधीश मार्फत चौकशीच्या नावाखाली त्रास दिल्याचे ते म्हणाले. दाऊदच्या बायकोला फोन केला हा आरोप करणारा हॅकर मनीष भंगाळे यात कसा आला. माजी मंत्री कृपाशंकर, समाजसेविका अंजली दमानिया असे एका पाठोपाठ या प्रकरणात कसे आले. बातम्या पेरल्या व माझी मीडिया ट्रायल कशी सुरू झाली. याचे सबळ पुरावे मी ‘नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान’ या पुस्तकात देणार असल्याचे खडसे म्हणाले.
मला व्हिलन केलं
एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. मला मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती, मी या पदाच्या शर्यतीतही होतो. मात्र, माझ्यावर आरोप करुन मला बाजुला करण्यात आलं. पंकजा मुंढे या मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असं म्हटल्या, त्यांनाही पद्धतशीरपणे हटवलं गेलं. विनोद तावडेंच्या बाबतीतही तेच घडलं, असे म्हणत एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा आपली खदखद व्यक्त केली आहे. तसेच, वरिष्ठांकडे माझ्याबद्दल चुकीचे गैरसमज पसरविण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर मला व्हिलन करण्यात आलं. वरिष्ठ पातळीवरील माझेही काही सहकारी मित्र, नेतेमंडळी मला सांगतातच की, आणि हे कुणी केलं सर्वांना माहितीय, असे खडसेंनी म्हटले.
देवेंद्रजी अजित दादांवर टिका करूच शकत नाहीत
देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टिका करूच शकत नाहीत. कारण त्यांनी आपले सर्व सत्व-तत्व सोडून त्यांच्यासोबत तीन दिवस संसार केला आहे. त्यांच्यासोबत तीन दिवस सरकार चालविले आहे. यासाºयात त्यांनी नैतिकता घालविली आहे. त्यामुळे ते अजितदादा यांच्यावर टिका करू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. सर्व कटकारस्थानाचे पुरावे मिळाले आहेत. अद्याप तरी हा प्रश्न पक्षा अंतर्गत आहे. याबाबत वरिष्ठांना भेटलो आहे. आता पुरावे ही देणार आहे. कारवाई झाली नाही तर पुढची दिशा ठरवू.