शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
2
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
3
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
4
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
5
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
6
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
7
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
8
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
9
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
11
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
12
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
13
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
14
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
16
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
17
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
18
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
19
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
20
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...

या सरकारला अमराठी का म्हणू नये? मराठी स्वाक्षरी कार्यक्रमास परवानगी नाकारल्याने मनसेचा संताप

By बाळकृष्ण परब | Published: February 26, 2021 2:26 PM

MNS Criticize Thackeray Government : मराठीच्या मुद्यावरून आता मनसे आणि राज्यातील सत्ताधारी शिवसेना पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत.

ठळक मुद्देमहाबिघाडी सरकारचं डोकं ठिकाणावर नाही, यावर शिक्कामोर्तब झालंयआता शंका यायला लागलीय की हे सरकार अमराठी आहे की काय?आम्ही हे ठकणावून सांगतो की सर्व नियम पाळून हा कार्यक्रम करणार म्हणजे करणारच

मुंबई - मराठीच्या (Marathi) मुद्यावरून आता मनसे (MNS) आणि राज्यातील सत्ताधारी शिवसेना (Shiv Sena) पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. मराठी भाषा दिनानिमित्त (Marathi Bhasha Din ) मनसेकडून शनिवार २७ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या मराठी स्वाक्षरी कार्यक्रमाला कोरोनाचे कारण देत पोलिसांनी परवानगी नाकाराली आहे. त्यामुळे मनसेने या निर्णयाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. (Why shouldn't Thackeray government be called non Marathi? MNS angry over denial of permission for Marathi signature program)

मराठी भाषा दिनानिमित्त मनसेकडून दादर येथील शिवाजी पार्क येथे मराठी स्वाक्षरी अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला काही कलाकारही उपस्थित राहण्याची शक्यता होती.  मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचे कारण देत पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. तसेच पोलिसांनी आयोजक अमेय खोपकर यांना नोटिसही बजावली आहे. 

अमेय खोपकर यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना पोलिसांसकडून या कार्यक्रमासाठीची परवानगी नाकारण्यात आली असल्याचे सांगितले. मात्र आपण कोरोनाबाबतच्या सर्व सरकारी नियमांचे पालन करून कार्यक्रम करणार आहोत. मग सरकारने जी काय कारवाई करायची आहे ती करावी, असे आव्हान दिले आहे.  दरम्यान, याबाबत केलेल्या ट्विटमध्ये अमेय खोपकर म्हणाले की, कोविडचा प्रसार होऊ नये यासाठी सरकारने जी नियमावली आखून दिली आहे, त्या नियमांचे काटेकोर पालन करून मनसेने मराठी भाषा दिन कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र सरकारने या कार्यक्रमाला कोविडच्या प्रसाराचे कारण देत परवानगी नाकारलीच. सोबतच कारवाईचाही धाक दाखवला आहे. 

ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत अशा संजय राठोडांसारख्या मंत्र्यांचे समर्थक लाखोंच्या संख्येने एकत्र येऊन शक्तिप्रदर्शन करतात. अशा गर्दीवर कारवाई करण्याची ज्यांच्यात धमक नाही. त्यांच्या डोळ्याच मराठी भाषा दिवस का खुपतो. महाबिघाडी सरकारचं डोकं ठिकाणावर नाही, यावर शिक्कामोर्तब झालंय. पण त्यापुढे जाऊन आता शंका यायला लागलीय की हे सरकार अमराठी आहे की काय? असा सवाल अमेय खोपकर यांनी उपस्थित केला. तसेच आम्ही हे ठकणावून सांगतो की सर्व नियम पाळून हा कार्यक्रम करणार म्हणजे करणारच.

टॅग्स :marathiमराठीMNSमनसेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीPoliticsराजकारणMarathi Bhasha Dinमराठी भाषा दिन