पाटणा: बिहारमध्ये नव्या वर्षात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. त्याचे संकेत राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी आणि माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी दिले आहेत. नितीश यांनी पुन्हा महागठबंधनमध्ये सामील करून घेण्याबद्दल पक्षाचे नेते विचार करतील, असं राबडीदेवी म्हणाल्या होत्या. अरुणाचल प्रदेशात भारतीय जनता पक्षानं नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) सातपैकी सहा आमदार फोडले. बिहारमध्ये मित्रपक्ष असलेल्या भाजपनं दिलेला धक्का नितीश यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यानंतर राजदनं नितीश यांना पुन्हा महागठबंधनमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. जदयूचे १७ आमदार राजदच्या संपर्कात; नितीशकुमारांच्या माजी मंत्र्याचा गौप्यस्फोटभारतीय जनता पक्ष बिहारमध्ये अरुणाचल प्रदेशची पुनरावृत्ती करू शकतो, असं राबडीदेवी म्हणाल्या. जेडीयूला सोबत घेऊन राज्यात सत्तांतर घडवण्याचा राजदचा प्रयत्न आहे. त्यासाठी खुद्द लालू प्रसाद यादव कामाला लागले आहेत. नितीश कुमार यांना लक्ष्य करू नका, अशा सूचना त्यांनी पक्षाच्या नेत्यांना केल्या आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपनं केलेलं राजकारण नितीश यांना पटलेलं नाही....तर नितीश कुमारांना २०२४ साली पंतप्रधान करू; 'राजद'ने मांडलं जबरदस्त गणितनितीश कुमार यांना महागठबंधनमध्ये आणण्यासाठी काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीमधील (यूपीए) काही नेतेदेखील कामाला लागल्याची चर्चा आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचीही मदत घेतली जाण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपनं केलेलं फोडाफोडीचं राजकारण ही राजदसाठी संधी आहे आणि नितीश यांच्यावर टीका करून ती गमावू नका, असा सल्ला लालूंनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दिला आहे. "नितीशकुमार यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे नव्हते; नेत्यांनी मन वळविल्याने त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले"नितीश कुमार नाराज; मुख्यमंत्रीपदाबद्दल मोठं विधानचार दिवसांपूर्वी जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक झाली. या बैठकीत पक्षाची धुरा खासदार रामचंद्र प्रसाद सिंह यांच्याकडे सोपवल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आणखी एक मोठं विधान केलं. त्यामुळे बिहारच्या राजकारणात खळबळ माजली आणि नितीश कुमार आता नेमकं काय करणार, याची चर्चा सर्वत्र सुरू झाली. मला मुख्यमंत्रिपद नको. राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं (एनडीए) मुख्यमंत्री कोणाला करायचं ते ठरवावं, असं नितीश कुमार यांनी म्हटलं.पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत नितीश यांनी अध्यक्षपदासाठी रामचंद्र प्रसाद सिंह यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. तो मंजूरदेखील झाला. त्यामुळे आता रामचंद्र प्रसाद सिंह संयुक्त जनता दलाचं नेतृत्त्व करतील. पक्षाची धुरा सिंह यांच्याकडे सोपवल्यानंतर नितीश यांनी मुख्यमंत्रिपदावरही भाष्य केलं. 'मी मुख्यमंत्रिपद स्वीकारावं यासाठी बराच आग्रह करण्यात आला. माझ्यावर बराच दबाव होता. त्यामुळे मी मुख्यमंत्रिपद स्वीकारलं. पण मला खुर्चीचा मोह नाही,' असं नितीश कुमार म्हणाले.
नितीश कुमार भाजपची साथ सोडणार?; 'तो' षटकार भाजपला महागात पडण्याची शक्यता
By कुणाल गवाणकर | Published: January 01, 2021 4:31 PM