शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

कन्हैया कुमार डाव्यांची साथ सोडणार? नितीश कुमार यांच्या निकटवर्तीयाची भेट घेतल्याने चर्चांना उधाण

By बाळकृष्ण परब | Published: February 16, 2021 10:10 AM

Will Kanhaiya Kumar leave the CPI : भाकपा नेते असलेल्या कन्हैया कुमार यांनी नितीश कुमार यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेल्या अशोक चौधरी यांची भेट घेतल्याने बिहारच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी भाकपाने कन्हैया कुमार यांच्याविरोधात एक प्रस्ताव पारित केला होतात्यापार्श्वभूमीवर कन्हैया कुमार आणि अशोक चौधरी यांची भेट झाल्याने या भेटीला अधिक महत्त्व आले आहेकन्हैया कुमार आणि अशोक चौधरी यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी ही भेट अराजकीय असल्याचे म्हटले आहे

पाटणा - जेएनयूमधील आंदोलनानंतर केंद्रातील मोदी सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील प्रमुख चेहरा बनलेले कन्हैया कुमार आणि भाकपामधील संबंध गेल्या काही काळात बिघडले आहेत. त्यातच आता भाकपा नेते असलेल्या कन्हैया कुमार यांनी नितीश कुमार यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेल्या अशोक चौधरी यांची भेट घेतल्याने बिहारच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कन्हैया कुमार हे डाव्यांची साथ सोडून जाणार असल्याची चर्चाही रंगली आहे.काही दिवसांपूर्वी भाकपाने कन्हैया कुमार यांच्याविरोधात एक प्रस्ताव पारित केला होता. पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पक्षाशी संबंधित एका अधिकाऱ्याला करण्यात आलेल्या मारहाणीनंतर कन्हैयावर ही कारवाई करण्यात आली होती. त्यापार्श्वभूमीवर कन्हैया कुमार आणि अशोक चौधरी यांची भेट झाल्याने या भेटीला अधिक महत्त्व आले आहे.दरम्यान, कन्हैया कुमार आणि अशोक चौधरी यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी ही भेट अराजकीय असल्याचे म्हटले आहे. दोघेही दीर्घकाळापासून एकमेकांना ओळखतात, त्यामुळे ही भेट झाल्याचे या सूत्रांनी म्हटले. मात्र भाजपाकडून राज्यमंत्री झालेल्या सुभाष सिंह यांनी या भेटीवर टीका केली आहे. त्यांनी कन्हैया कुमारचा उल्लेख मानसिक रुग्ण असा केला असून, अशी भेट अयोग्य असल्याचे म्हटले आहे.याभेटीबाबत जेडीयूचे प्रवक्ते अजय आलोक यांनी सांगितले की, कन्हैया कुमार यांनी त्यांची विकृत विचारसरणी सोडली तर त्यांचे पक्षात स्वागत केले जाईल. राजकीय जाणकारांच्या मते कन्हैया कुमारची ही भेट म्हणजे विधानसभा निवडणुकीत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या जेडीयूकडून राज्याच्या राजकारणात आपले महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.कन्हैया कुमार याने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बेगुसराय मतदारसंघातून गिरिराज सिंह यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र त्या निवडणुकीत गिरिराज सिंह यांनी कन्हैया कुमार यांचा दारुण पराभव केला होता.

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमारBiharबिहारPoliticsराजकारण