मुंबई: आणीबाणी घोषित करणे इंदिरा गांधी यांची चूक होती. मात्र, त्याचा पक्ष म्हणून काँग्रेसने कधीही फायदा करून घेतला नाही, असं मत काँग्रेस नेते राहुल गांधींनी व्यक्त केलं. यानंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं गुजरात दंगलीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. (congress leader rahul gandhi says emergency was mistake of indira gandhi)आणीबाणी घोषित करणे आजीची चूकच, पण...; राहुल गांधींनी सांगितली 'मन की बात'इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीबद्दल राहुल गांधींनी माफी मागणं यात आम्हाला गैर वाटत नाही. राहुल यांनी मनाचा मोठेपणा दाखवून चूक स्वीकारली. इंदिरा गांधींनी केलेल्या चुकीची त्यांनी कबुली दिली. आता ग्रोधा दंगलीबद्दल गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची माफी मागणार का, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी विचारला आहे.“इंदिरा गांधींची निवडणूक रद्द करण्याची हिंमत तेव्हाच्या न्यायव्यवस्थेत होती, पण आज...”राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनीदेखील गुजरात दंगलीवरून पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं आहे. 'राहुल गांधींनी त्यांच्या आजी इंदिरा गांधींनी केलेली चूक स्वीकारली. याआधी काँग्रेसनं दिल्लीत झालेल्या दंगलीबद्दलही माफी मागितली आहे. आता नरेंद्र मोदी आणि भाजप गुजरात दंगल ही चूक होती, असं म्हणणार का?, मोदी आणि भाजपनं गुजरात दंगलीबद्दल देशाची माफी मागावी,' अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केली.काय म्हणाले राहुल गांधी?कॉर्नेल विद्यापीठात एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी आणीबाणीबाबतचं मत व्यक्त केले. प्रोफेसर कौशिक बसु यांच्याशी साधलेल्या संवादादरम्यान राहुल गांधी यांनी आणीबाणीबाबत म्हटलं की, आणीबाणी घोषित करणं इंदिरा गांधी यांची चूक होती. मात्र, त्याचा पक्ष म्हणून काँग्रेसनं कधीही फायदा करून घेतला नाही. आणीबाणीचा काळ आणि आताची परिस्थिती भिन्न आहे. काँग्रेस पक्षानं स्वतंत्र संस्थांचा कधीही गैरवापर केला नाही, असा दावा राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना केला.
"राहुल गांधींनी आणीबाणीची चूक स्वीकारली; मोदी गुजरात दंगलीची चूक स्वीकारणार का?"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2021 11:27 AM