मुंबई: लव्ह जिहादविरोधात उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सरकारनं कायदा करण्याची तयारी सुरू केली आहे. यानंतर आता राज्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ठाकरे सरकारनं लव्ह जिहादविरोधात कायदा करण्याची मागणी केली आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. बिहारमध्ये भाजपचं सरकार आहे. नितीश कुमार भाजपचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी कायदा केल्यावर त्याचा अभ्यास करू, असं राऊत म्हणाले.लव जिहादवरुन महाविकास आघाडीत वादंग होणार? हिंदुत्वावरुन भाजपा करणार शिवसेनेची कोंडी'उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमधील सरकारं लव्ह जिहादविरोधात कायदा करणार आहेत. त्यानंतर आता भाजपचे राज्यातील नेतेही लव्ह जिहादविरोधी कायदा कधी करणार, असा प्रश्न ठाकरे सरकारला विचारत आहेत. याबद्दल मी सकाळीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोललो. आधी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमध्ये कायदा होऊ दे. त्यानंतर बिहारमध्ये कायदा होऊ दे. मग आम्ही त्याचा अभ्यास करू. यानंतर राज्य सरकार चर्चा करून निर्णय घेईल,' असं राऊत यांनी सांगितलं.
...तेव्हा 'लव्ह जिहाद'विरोधात कायदा करण्याचा विचार करू; राऊतांनी सांगितली वेळ
By कुणाल गवाणकर | Published: November 23, 2020 12:31 PM