West Bengal By-Election: पश्चिम बंगालचे (West Bengal) मुख्य निवडणूक अधिकारी अरीज आफताब यांनी शुक्रवारी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. त्यांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन तपासण्यास सांगितले आहे. हे पत्र पश्चिम बंगालमध्ये पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. एकूण सात जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. हे पत्र दक्षिण कोलकातासह पाच जिल्ह्यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. (Election commission preparing for by election on 7 seats in West Bengal.)
तृणमूल काँग्रेसचे नेते काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात गेले होते. तेव्हा त्यांनी बंगालमध्ये पोटनिवडणूक कधी घेणार, असा सवाल केला होता. या पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकाऱ्यांनी ही पत्रे त्या त्या मतदारसंघांच्या जिल्ह्यांना पाठविली आहेत. या अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली असून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जेणेकरून 2021 मध्येच पोटनिवडणूक घेता येईल, असे ते म्हणाले.
पश्चिम बंगालमध्ये जंगीपुर, शमशेरगंज, खर्धा, भवानीपुर, दिनाहाटा, शांतिपुर आणि गोशाबा या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. जंगीपुर आणि शमशेरगंज मतदारसंघांच्या दोन उमेदवारांचा निवडणुकीवेळीच मृत्यू झाला होता. एक टीएमसी तर दुसरा उमेदवार काँग्रेसचा होता. तर खर्धा आणि गोशाबा येथून निवडणूक जिंकणाऱ्या तृणमूलच्या उमेदवारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तर शांतीपूर आणि दिनाहाटा मधून विजयी झालेल्या भाजपाच्या दोन आमदारांनी राजीनामा दिला आहे. या दोघांनाही आमदारकीपेक्षा खासदारकी हवी आहे. हे दोन्ही केंद्र सरकारमध्ये खासदार आहेत. यापैकी निसिथ प्रामाणिक यांना मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांना मशीन तयार ठेवण्याचे आदेश दिलेले असले तरीदेखील पोटनिवडणुकीच्या तारखा अद्याप ठरलेल्या नाहीत.
ममता बॅनर्जी कुठून लढणार....पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत पराभव पाहिलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना काहीही करून निवडून यावे लागणार आहे. त्याचा परंपरागत मतदारसंघ भवानीपूर आहे. महत्वाचे म्हणजे, कृषि मंत्री शोभन देव यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे ममता या जागेवर लढणार आहेत. तर देव यांचा मतदारसंघ खर्धा मतदारसंघातून निवडणूक लढतील. तो त्यांचा मतदारसंघ आहे.