शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

"आम्ही सरकारसोबतच; पण जनहितासाठी आंदोलन करू", अबू आझमींचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2021 5:01 PM

Abu Azmi : राज्य सरकार सर्वसामान्य माणसांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असेल, तर आम्ही त्याविरुद्ध निश्चितच आंदोलन करू. त्याची सुरुवात मुंबइतून होईल, असे अबू आझमी यांनी सांगितले.

ठळक मुद्देसरकारने लाॅकडाऊनचा निर्णय घेऊ नये. घ्यायचाच असेल, तर आधी गरिबांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी अबू आझमी यांनी केली.

यवतमाळ : आम्ही राज्य सरकारमध्ये सामील असलो, तरी जनहिताच्या मुद्द्यावर आंदोलन करू. शिक्षण क्षेत्रात दिल्ली सरकारने खूप सुधारणा केली. पाणी, वीज बिलही माफ केले. मोहोल्ला क्लिनिकमधून दिल्लीच्या लोकांना दिलासा मिळाला. दिल्ली सरकार या सुधारणा करू शकते तर महाराष्ट्र सरकार का नाही? असा सवाल आमदार अबू असीम आझमी यांनी उपस्थित केला. ("work with the government but But we will agitate for the public" Abu Azmi warned)

ते यवतमाळ येथे शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. मुंबइचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपाबाबत ते म्हणाले, मंत्र्यांनी जेव्हा मागणी केली, तेव्हाच परमबीर सिंग यांनी शरद पवारांना माहिती का दिली नाही? आता बदली झाल्यावर ते का बोलत आहेत? सचिन वाझेंसारखा छोटा अधिकारी वरिष्ठांची मंजुरी असल्याशिवाय कोणतेही काम करू शकत नाही. या प्रकरणात चौकशी होत आहे. त्यापूर्वीच गृहमंत्र्यांचा राजीनामा मागणे चुकीचे आहे. त्यांनी तो सध्याच देऊही नये. आम्ही सोबत राहिलो म्हणून सरकार राहील अन् आम्ही विरोधात गेलो म्हणून सरकार पडणारही नाही. परंतु, राज्य सरकार सर्वसामान्य माणसांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असेल, तर आम्ही त्याविरुद्ध निश्चितच आंदोलन करू. त्याची सुरुवात मुंबइतून होईल.

केंद्राच्या कारभाराबाबत आझमी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे अंबानी आणि अदानींसाठी काम करीत आहेत. हम दो हमारे दो हीच त्यांची नीती आहे. त्यांनी देश आर्थिकदृष्ट्या बरबाद केला आहे. १५ टक्के मुस्लीमांकडे बोट दाखवून ८५ टक्के हिंदूंना घाबरविले जात आहे. मात्र रेल्वेचे खासगीकरण झाल्यास नुकसान मुस्लीमांचे अधिक होणार की हिंदू कर्मचाऱ्यांचे? म्हणूनच ८५ टक्के लोकसंख्येने आता मोदी सरकारविरुद्ध जागृत झाले पाहिजे, असे आवाहनही आझमी यांनी केले. नव्या शिक्षण धोरणातूनही समाजाची विभागणी करण्याचेच काम होणार आहे. श्रीमंतांचा मुला जादा पैसे भरून शिकेल, पण गरिबांच्या मुलांना प्रवेश मिळणेही कठीण होणार आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारने इतर बाबींवरील खर्च कमी करून शिक्षणावर जादा खर्च करावा, अशीही मागणी त्यांनी यावेळी नोंदविली.

(CoronaVirus News : मुंबईत कडक निर्बंध; सामान्यांचा लोकल प्रवास बंद होण्याची शक्यता, महापौरांची माहिती)

आता लॉकडाऊन नकोचमागच्या वेळी लॉकडाऊन झाला, तेव्हा अनेक समाजसेवक पुढे आले. त्यांनी गरजूंना अन्नपाणी वाटप केले. मात्र आता तेही थकले आहेत. आता जर लाॅकडाऊन झाले, तर लोक कोरोनापेक्षा भूक आणि बेकारीमुळे मरतील. त्यामुळे सरकारने लाॅकडाऊनचा निर्णय घेऊ नये. घ्यायचाच असेल, तर आधी गरिबांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी आमदार अबू असीम आझमी यांनी केली.

(CoronaVirus News : राज्यात १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस द्या, नाना पटोलेंची मागणी)

टॅग्स :Abu Azmiअबू आझमीYavatmalयवतमाळPoliticsराजकारणCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसParam Bir Singhपरम बीर सिंगSharad Pawarशरद पवार