शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

'होय, तुम्हाला हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज आहे', आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

By ravalnath.patil | Updated: October 13, 2020 19:12 IST

Ashish Shelar : तुमच्या हिंदुत्वाची भेसळ झालीय, देव भूमीतून आलेल्या राज्यपाल महोदय भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमाणपत्राची तुम्हाला खरंच गरज आहे. ही काळाची गरज आहे, असे आशिष शेलार यांनी सांगितले.

ठळक मुद्देया मुंबईवर आणि भारतावर हल्ला करणाऱ्या याकुबला फाशी झाली, त्यावेळी त्याच्या फाशीला विरोध करणाऱ्यांना तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळात घेतले आहे," असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

मुंबई : राज्यातील हॉटेल, बार उघडण्यात आले असताना मंदिरं बंद का? असा सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पत्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची आठवण करून दिली. त्यानंतर राज्यपालांनी लिहिलेल्या पत्राला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असे म्हटले आहे.  त्यामुळे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात वादाची ठिणगी पडल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, यावरून  भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 'होय, तुमच्या हिंदुत्वाची भेसळ झाली आहे. त्यामुळे राज्यपालांच्या प्रमाणपत्राची तुम्हाला खरंच गरज आहे,' अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज खरंच हिंदुत्वाचे प्रमाणपत्र घेण्याची वेळ आलेली आहे. याचे कारण हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वापासून त्यांनी केव्हाच फारकत घेतली आहे. त्यांनी त्याची प्रतारणा केली आहे. तुम्हाला हे नाकारता येणार नाही. या मुंबईवर आणि भारतावर हल्ला करणाऱ्या याकुबला फाशी झाली, त्यावेळी त्याच्या फाशीला विरोध करणाऱ्यांना तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळात घेतले आहे," असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

याचबरोबर,  हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्यांना तुम्ही मांडीवर घेऊन बसलात आहात. तुम्हाला हेही नाकारता येणार नाही की, कसाबला बिर्याणी खायला घातली. त्यांच्याशी तुम्ही संगनमत केले आहे. ज्यावेळी पंढरपूरला पुजेला गेलात त्यावेळी आमच्या विठूरायाच्या चरणाला स्पर्शही केला नाही, हे तुम्हाला नाकारता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला प्रमाणपत्राची खरंच गरज आहे. तुमच्या हिंदुत्वाची भेसळ झालीय, देव भूमीतून आलेल्या राज्यपाल महोदय भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमाणपत्राची तुम्हाला खरंच गरज आहे. ही काळाची गरज आहे, असे आशिष शेलार यांनी सांगितले.

तुम्ही अचानक धर्मनिरपेक्ष झालात का? राज्यपालांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवालराज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. यामध्ये लॉकडाऊन शब्द केराच्या टोपलीत टाकायचा आहे असे तुम्ही म्हटले होते. मात्र तरीही अद्याप राज्यातील प्रार्थनास्थळे उघडलेली नाहीत. एका बाजूला बार, हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिली गेली आहे. मात्र प्रार्थनास्थळे बंदच आहेत. देव अजूनही लॉकडाऊनमध्येच आहेत. अनेक शिष्टमंडळांनी, राजकीय नेत्यांनी, सामाजिक संघटनांनी माझ्याकडे प्रार्थनास्थळं सुरू करण्याची मागणी केली आहे, असे राज्यपालांनी पत्रात नमूद केले आहे. याचबरोबर, राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची आठवण करून दिली आहे. 'तुम्ही मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अयोध्येला गेला होतात. तुम्ही आषाढी एकादशीला पंढरपूरला भेट दिली. तिथे पूजाही केली. मग आता मंदिर सुरू करू नये यासाठी तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत का? तुम्ही अचानक धर्मनिरपेक्ष झालात का?, असा खोचक सवाल कोश्यारींनी उपस्थित केला आहे.

माझ्या हिंदुत्वाला प्रमाणपत्राची आवश्यकता नाही - मुख्यमंत्रीराज्यपालांनी लिहिलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रानेच उत्तर दिले आहे. 'आपण पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे. मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणं हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही,' अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच, 'मी अचानक धर्मनिरपेक्ष झालो का? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे धर्मनिरपेक्ष असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा धर्मनिरपेक्ष आहे, तो आपल्याला मान्य नाही का?,' असा सवाल मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना विचारला आहे.

राज्यपालांच्या पत्राला उत्तर दिलंय, ते अतिशय दुर्दैवी आहे - देवेंद्र फडणवीस भाजपा नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना मुख्यमंत्र्यांनी लिहिलेल्या पत्राबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी राज्यपाल यांच्याकडे जी निवेदने येत असतात. ती निवेदने घेऊन राज्यपाल हे एक पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे पाठवत असतात. त्या पत्रांबाबत मुख्यमंत्र्यांनी योग्य तो निर्णय घ्यायचा असतो. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे राज्यपालांच्या पत्राला उत्तर पाठवले आहे, ते दुर्दैवी आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारUddhav Thackerayउद्धव ठाकरेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्र