मुंबई - शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या ठाणे आणि मुंबईतील निवासस्थानी आणि कार्यालयांवर ईडीने केलेल्या कारवाईमुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या कारवाईविरोधात शिवसेनेकडून संतप्त प्रतिक्रिया समोर आली आहे. कितीही प्रयत्न केला तरी हे महाविकास आघाडीचे सरकार, मंत्री आणि आमदार शरण जाणार नाहीत. तुम्ही सुरुवात केली असेत तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे.प्रताप सरनाईकांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने केलेल्या कारवाईबाबत प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. कितीही दबाव आणला तरी महाविकास आाडीचे सरकार, मंत्री आणि आमदार शरण जाणार नाहीत. सरकारी संस्थांच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र सुरुवात तुम्ही केली असेल तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे. ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे. मात्र अशा कारवाया करून पुढची २५ वर्षे भाजपाचे महाराष्ट्रात सरकार येणार नाही. तसेच सरकारी संस्थांनी राजकीय शाखा असल्यासारखे वागू नये, असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला.शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाचे (ईडी) अधिकारी पोहोचले आहेत. त्यांचे पुत्र पूर्वेश आणि विहंग यांच्या घरीदेखील ईडीचं पथक दाखल झालं आहे. त्यांच्या कार्यालयांमध्येही ईडीचे अधिकारी पोहोचले आहेत. सध्या प्रताप सरनाईक आणि त्यांचे दोन्ही पुत्र परदेशात आहेत. त्यांनीदेखील या माहितीला दुजोरीला दिला आहे. पण ईडी कोणत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोहोचली आहे, याचा तपशील आपल्याकडे नसल्याचं त्यांनी सांगितले आहे.
"सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार," सरनाईकांवरील कारवाईवरून संजय राऊतांचे आव्हान
By बाळकृष्ण परब | Published: November 24, 2020 11:36 AM
Shiv Sena MLA Pratap Sarnaik News : प्रताप सरनाईक यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या ठाणे आणि मुंबईतील निवासस्थानी आणि कार्यालयांवर ईडीने केलेल्या कारवाईमुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
ठळक मुद्देकितीही प्रयत्न केला तरी हे महाविकास आघाडीचे सरकार, मंत्री आणि आमदार शरण जाणार नाहीततुम्ही सुरुवात केली असेत तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहेही कारवाई म्हणजे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे