पुणे : आश्रमशाळेत अधीक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक म्हणून नोकरी लावण्याच्या आमिषाने १९ जणांची तब्बल १ कोटी १४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़. त्यात संस्थाचालक, राजकीय नेते आणि एजंटयांच्या साटेलोटातून तरुणांची संगनमतांनी फसवणूक केली आहे़. एजंटातील पैशाच्या देण्याघेण्यावरुन एकाने दुसऱ्याचे अपहरण केल्याने हा प्रकार समोर आला आहे़. त्यात फसवणूक झालेले बहुतांश तरुण हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोलेयेथील राहणारे आहेत़.याबाबतची माहिती अशी, विजय श्रीपती पाटील (रा़ नांदेड सिटी) याने संस्थाचालकांच्या मदतीने अकोले तालुक्यातील तरुणांना नोकरीचे आमिष दाखवूनदीड वर्षांपासून १९ तरुणांकडून १ कोटी १४ लाख रुपये घेतले़. रायगड, आळंदी,अहमदनगर येथील संस्थाचालकांशी संगनमत करुन यातील काही जणांना संस्थेच्या लेटरहेडवर नोकरी दिल्याचे पत्रही दिले़. काही जणांनी या संस्थांमध्ये ४ ते ५ महिने नोकरीही केली़. मात्र, त्यांना त्याचा कोणताही पगार दिला नाही़.तसेच त्यांना त्यानंतर कामावरुन काढून टाकले़. आपली फसवणूक झाल्याचे यातरुणांच्या लक्षात आल्यावर त्यांनी विजय पाटील याच्याकडे पैसे परत मागण्यास सुरुवात केली़. त्यासाठी काहींनी घरात नातेवाईक आजारी असल्याचे कारण सांगितले़. तेव्हा त्याने या तरुणांना जवळपास १५ लाख रुपये परतही केले़.याबाबत विजय पाटील व जगन्नाथ माने यांच्यातील पैशांच्या देवाण घेवाणीतूनवाद निर्माण झाला़. माने पाटील याच्याकडे ३० लाखांची मागणी करीत होता़ . तेव्हा पाटील याने त्याला पोस्ट डेटेड चेक दिले़. परंतु, ते वटले नाही़ त्यामुळे माने व त्याचे साथीदार गेल्या शनिवारी पाटील याच्या नांदेड सिटी येथे गेले व त्याला आपल्याबरोबर घेऊन गेले़ .त्यांनी चार दिवस पाटील याला डांबून ठेवले होते़. त्याच्या पत्नीने ही बाब पोलिसांना सांगितल्यावर पाटील याची मंगळवारी सायंकाळी सुटका झाली़. याबाबत विजय पाटील याने आपण या तरुणांकडून १ कोटी १४ लाख रुपये नोकरी लावण्यासाठी घेतल्याचे मान्य करुन सांगितले की, यातील जवळपास ६९ लाख रुपये आपण रायगड, आळंदी येथील संस्थाचालकांना या तरुणांना नोकरीलावण्यासाठी दिले आहे़ अहमदनगरमधील एका राजकीय पक्षाच्या नेत्याला १४ लाख ७० हजार रुपये दिले असून त्याचा आपल्याकडे हिशोब आहे़. याबाबत हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी सांगितले की, आरोपी जरी हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असला तरी त्याचेव्यवहार हे त्यांनी त्यांच्या गावातून तसेचपुणे शहरातील एका हॉटेलमध्येपैसे दिले आहेत़. त्यांनी आमच्याकडे तक्रार दिली तर आम्ही तक्रार घेऊ़.़़़़नोकरी मिळाल्यामुळेच आमच्या त्यांच्याशी संपर्क झाला...
याबाबत तरुणांनी ' लोकमत 'ला सांगितले की, आमच्या तालुक्यातील दोघा जणांनारायगडमधील एका संस्थेत पैसे दिल्यानंतर नोकरी मिळाली होती़ त्यातून आमचाविजय पाटील याच्याशी संपर्क झाला़ आणखी एका तरुणाने सांगितले की,नोकरीसाठी १५ गुंठे जमीन विकून मी पैसे दिले आहेत़ काहींनी घरावर कर्जकाढून नोकरीसाठी विजय पाटील याला पैसे दिले होते़. एका बाजूला नोकरी मिळाली नाही तर दुसरीकडे कर्जाचे हप्ते थकल्याने घरावर जप्ती येण्याची शक्यता निर्माण झाली आहे़. गेले दोन तीन दिवस हे तरुण पुण्यात फिरत आहेत़.
..............
पैशासाठी विजय पाटीलच्या घरात मुक्काम
विजय पाटील याच्याकडून पैसे वसुल करण्यासाठी या तरुणांची आई व नातेवाईक अशा चार महिला दोन दिवसांपूर्वी नांदेड सिटीमध्ये गेल्या होत्या़. तेथील सुरक्षा रक्षकाने त्यांना दरवाज्यात अडविल्यावर विजय पाटील यांची पत्नी तेथे आली़. या महिलांना आपल्याबरोबर घरी घेऊन गेल्या होत्या़. या महिलापैसे वसुलीसाठी दोन दिवस त्यांच्या घरात राहिल्या होत्या़.