कळस (ता. इंदापूर) येथील या संस्थेच्या माध्यमातून सभासदांना दरवर्षी ऊस शेतीसह डाळींब, द्राक्षे या फळबागांना तीन लाखांपर्यत बिनव्याजी कर्जपुरवठा केला जातो. गतवर्षी वाटप करण्यात आलेल्या कर्जाची वसुली शंभर टक्के झाली होती. मार्च अखेर कजार्चा भरणा केलेल्या सभासदांना दरवर्षी नियमित कर्जपुरवठा केला जातो या वषीर्ही पहिल्या आठवड्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सुमारे ४ कोटी रूपयाचा पत आराखडा मंजूर करुन पहिल्या टप्यातच फळबागाधारक ४७ सभासदांना समारे १ कोटी रुपये कर्जवाटपास प्रारंभ केला आहे. मागणीप्रमाणे सर्व सभादाना कर्ज वितरीत करण्यात येणार आहे. संस्थेचे स्वमालकिचे भागभांडवल वाढले आहे वार्षिक उलाढाल २ कोटी रुपये झाली आहे नियमित कर्ज भरणारे सभासदांना शासनाच्या माध्यमातून अनुदान प्राप्त करुन देण्यात आले आहे. संस्थेचे सचिव आबासाहेब नाझरकर व जिल्हा बँकेचे निरीक्षक बाबासाहेब धायतोंडे यांनी संस्थेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. संस्थेचे संचालक दादा सांगळे, पोपटराव सांगळे,पप्पु सांगळे, रघुनाथ सांगळे, तात्याराम सांगळे लक्ष्मण खारतोडे, अजित पाटोळे, उत्तम शिंदे, संभाजी सपकळ, हनुमंत जामदार, सुनिता सांगळे, मनिषा पवार यांचे सहकायार्तून संस्था प्रगतीकडे वाटचाल करत आहे
सभासदांना खरीप हंगामासाठी कर्जवाटपास सुरुवात करण्यात आली आहे.
१२०४२०२१-बारामती-०३