बारामती : राज्यातील २२ हजार ग्रामसेवकांनी दुष्काळ निवारणासाठी ‘जलयुक्त शिवार अभियाना’ला त्यांचे एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. यातून सुमारे २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे.महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे २२ हजार ग्रामसेवक सदस्य आहेत. या युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन दुष्काळ निवारण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. या वेतनाच्या कपातीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासह ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतेच पत्र, धनादेश दिला. (वार्ताहर)
दुष्काळासाठी ग्रामसेवकांचे १ दिवसाचे वेतन
By admin | Published: October 15, 2015 12:56 AM