शिक्रापूर : शिक्रापूर येथील पुणे-नगर रोड लगत उभ्या केलेल्या स्विप्ट कारमध्ये ठेवलेली १ लाख ८० हजार रुपये रक्कम चोरट्यांनी पळवली. या बाबत सागर शहाजी भोसले (वय २७ रा. कोंढपुरी, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलिसांत तक्रार दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर भोसले हे त्यांच्या जवळील कार (एम एच १४ बी एक्स २९३७) घेऊन कोंढपुरी वरून शिक्रापूर येथे कामानिमित्त येत असताना त्यांच्या कारमध्ये १ लाख ८० हजार रुपये त्यांनी ठेवले होते. शिक्रापूर येथील विद्युत वितरण कार्यालयात गाडी पार्क करून ते गेले. तेथील काम उरकून ते पुन्हा आपल्या गाडी जवळ आले असताना त्यांना गाडीचा उजव्या बाजूचा दरवाजा उघडा दिसला. आत पुढील डिकीत ठेवलेले पैसे चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक मधुकर खिलारे, पोलीस नाईक योगेश नागरगोजे यांनी जाऊन गाडीची पाहणी केली. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कानगुडे करत आहेत.
कारमध्ये ठेवलेली १ लाख ८० हजारांची रक्कम लंपास; शिक्रापूर पोलिसांत तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 1:39 PM
पुणे-नगर रोड लगत उभ्या केलेल्या स्विप्ट कारमध्ये ठेवलेली १ लाख ८० हजार रुपये रक्कम चोरट्यांनी पळवली. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कानगुडे करत आहेत.
ठळक मुद्देसागर शहाजी भोसले (वय २७) यांनी शिक्रापूर पोलिसांत दिली तक्रारकारमध्ये ठेवले होते १ लाख ८० हजार रुपये