शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

पीडब्ल्यूडीच्या अभियंत्यास मागितली १ लाखाची खंडणी

By admin | Published: October 26, 2016 5:41 AM

न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या गुन्ह्यात बदनामी करण्याची धमकी देऊन १ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या इंदापूर येथील भष्ट्राचारविरोधी युवक संघर्ष समितीच्या संस्थापक

पुणे : न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या गुन्ह्यात बदनामी करण्याची धमकी देऊन १ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या इंदापूर येथील भष्ट्राचारविरोधी युवक संघर्ष समितीच्या संस्थापक प्रदेशाध्यक्षासह दोघांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली़ सेंट्रल बिल्डिंगमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीत सापळा रचून मंगळवारी सायंकाळी या दोघांना पकडण्यात आले़ नितीन मारुती आरडे आणि प्रकाश सूर्यभान आरडे (दोघेही रा़ हिंगणेगाव, ता़ इंदापूर) अशी त्यांची नावे आहेत़ नितीन आरडे हे भष्ट्राचारविरोधी युवक संघर्ष महाराष्ट्र या संस्थेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष आहेत़ अजयकुमार बाबूराव भोसले यांनी बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़भोसले यांच्यावर श्रीगोंदा येथे २००८ मध्ये विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल होता़ त्या खटल्यात त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे़ या गुन्ह्याची माहिती सर्वांना सांगून तुमची बदनामी करु, असे हे दोघे जण त्यांना सांगून त्यांच्याकडे १ लाख रुपयांची खंडणी मागत होते़ भोसले यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बहाद्दरपुरे यांची भेट घेऊन याबाबत तक्रार केली़ पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे भोसले यांना आरडे यांना पैसे घेण्यासाठी बोलविले़ पोलिसांनी भोसले यांच्या कार्यालयाजवळ सापळा रचला होता़ भोसले यांच्याकडून पैसे स्वीकारत असताना पोलिसांनी दोघांना रंगेहात पकडले़ (प्रतिनिधी)