मंजूर झालेल्या निधीतून इंदापूर तालुक्यातील लाकडी गावातील बगलेवस्ती ते खाडेवस्ती रस्ता करण्यासाठी २० लाखांचा निधी, याच गावातील मुस्लिम मज्जिद संरक्षक भिंत बांधणे ( ५० लाख), बेलवाडी येथील पवारवस्ती, थोरातवस्ती हायमास्ट दिवे बसवणे (३ लाख), निंबोडी गावात बहुउद्देशीय शरदचंद्रजी पवार सभागृह बांधणे २५ लाख रुपये, मौजे पळसदेव येथील शेलारपट्टा येथे हनुमान मंदिर करणे (५ लाख), डिकसळ येथील पोंदकुल वस्ती रस्ता करणे (२०लाख रुपये), मौजे कळंब येथील विश्वासराव रणसिंग वाचनालय (२० लाख), काटी येथील भोंगवस्ती अवताडेवस्ती रस्ता करणे (१० लाख), रणगाव येथील शिवाजी रकटे घर ते किसन जाधव वस्ती वीस लाख, दगडवाडी ते निर्वांगी रस्ता करणे (२० लाख), गोखळी येथील पारेकरवस्ती आंब्याचा मळा रस्ता डांबरीकरण करणे (१५ लाख), अंथुर्णे येथील बारामती रस्ता ते सावतामाळी रस्ता करणे (२० लाख), निंबोडी येथील घोळवेवस्ती ते डोईफोडेवस्ती रस्ता करणे (२५ लाख), निमगाव केतकी येथील खोरेवस्तीचा रस्ता करणे (२५लाख), तालुक्यातील अशी अपेक्षित कामे मार्गी लागणार आहेत.
सात जिल्हा परिषद गटातील बहुतेक गावांना या निधीमधून आपली कामे मार्गी लावता येणार आहेत, उर्वरित राहिलेल्या विकासकामांसाठी शासनाच्या माध्यमातून निधी मंजूर करण्याचे येईल असे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.