पुणे : सध्या आॅनलाइनचं युग असल्याने घरातील सामानापासून ते विमानाच्या तिकिटापर्यंत सर्व गोष्टी आॅनलाइन बुक केल्या जात आहेत. हजारो वेबसाईट्स तसेच अॅपच्या माध्यमातून माहितीची देवाणघेवाण केली जात आहे. आॅनलाइनचा वापर जरी वाढला असला तरी फसवणुकीचे धोकेसुद्धा शेकडो पटींनी वाढले आहेत. सध्या अॅमेझॉन या नामांकित वस्तू विक्रीच्या वेबसाईट्च्या नावे व्हॉट्सअॅपवर एक खोट्या आॅफरचा मेसेज फिरत असून, त्यात दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपली माहिती भरल्याने ती माहिती चोरीला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अॅमेझॉन या नामांकित वेबसाईटच्या नावाने अॅमेझॉन की सबसे बडी सेल अशा शीर्षकाचा एक मेसेज व्हॉट्सअॅपवर फिरत आहे. त्यात कॅनॉनचा कॅमेरा केवळ १९९ रुपये, व्हिवो कंपनीचा मोबाईल १७९९ रुपये, अॅपल कंपनीचे घड्याळ केवळ ११ रुपयांना तर जेबिएलचे स्पिकअर हे ११७ रुपयांना असल्याचे म्हटले आहे. या मेसेजच्या खाली एक लिंक देण्यात आली आहे. त्या लिंकवर क्लिक करून आॅर्डर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर फ्री डिलिव्हरी आणि वस्तू मिळाल्यावर पैसे भरण्याची सोय असल्याचेही यात म्हटले आहे.अॅमेझॉनच्या नावाने खोटी वेबसाईट तयार करून ग्राहकांची माहिती चोरण्यात येत आहे. ही खोटी वेबसाईट दोन दिवसांपूर्वी तयार करण्यात आली आहे. व्हॉट्सअॅपवर सध्या फिरत असलेला मेसेज खोटा असून नागरिकांची वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी तो तयार करण्यात आला आहे. त्या मेसेजमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर अॅमेझॉन वेबसाईटचे नाव असलेले खोटे पेज येते. वस्तू खरेदी करण्यासाठी तुम्हाला लॉगिन करण्यास सांगण्यात येते. तुम्ही लॉगिन केल्यानंतर तुमचा आयडी आणि पासवर्ड हॅकर्स चोरी करतात. त्याचा वापर करुन ते अॅमेझॉनच्या खऱ्या वेबसाईटवरून खरेदी करू शकतात. तसेच तुमच्या डेबिट कार्ड तसेच क्रेडिट कार्डची माहितीसुद्धा चोरू शकतात. त्यामुळे नागरिकांनी अशा मेसेजची खात्री केल्याशिवाय आपली वैयक्तिक माहिती देऊ नये.- जय गायकवाड, सायबरतज्ज्ञहा मेसेज खोटा...हा मेसेज खोटा असल्याचे सायबर तज्ञांचे म्हणणे आहे. अॅमेझॉनचे नाव वापरुन खोटी वेबसाईट तयार करुन नागरिकांची माहिती चोरण्यात येत आहे.हा हा मेसेज खरा समजून नागरिक वस्तू आॅर्डर करीत आहेत. परंतु यामुळे नागरिकांची वैयक्तिक माहिती चोरीला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.