शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

Pune: प्रवेशासाठी 10 लाखांची लाच; पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयाचा डीन रंगेहात जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2023 8:17 PM

दहा लाख रुपये स्वीकारताना डीनला रंगेहात पकडण्यात आले...

- किरण शिंदे 

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या नव्याने स्थापन झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी सोळा लाख रुपये लाचेची मागणी करून त्यातील दहा लाख रुपये स्वीकारताना डीनला रंगेहात पकडण्यात आले. आज सायंकाळी पुणे महानगरपालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात ही कारवाई करण्यात आली. आशिष श्रीनाथ बनगिनवार, (वय 54 वर्ष, डीन (वर्ग-1) असे रंगेहात पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 49 वर्षीय डॉक्टरने तक्रार दिली आहे. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांचा मुलगा NEET परिक्षा – 2023 मध्ये उत्तीर्ण झाला होता. त्याची एम.बी.बी.एस.च्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्याच्या पहिला कॅप राऊंडमध्ये पुणे महानगरपालिका वैद्यकिय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालय, पुणे येथे इन्स्टिट्यूशनल कोटामधून निवड झाली होती. यासाठी 22 लाख 50 हजार रुपये इतके प्रवेश शुल्क होते. मात्र महाविद्यालयाचे डीन त्यांनी 16 लाख रुपये लाचेच्या स्वरूपात मागितले होते. 

दरम्यान लाच देणे मान्य नसल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात याची तक्रार केली होती. दरम्यान लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आलेल्या तक्रारीची पडताळणी केली असता आशिष बनगिनवार यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मागील दोन दिवसांपासून प्रतिबंधक विभागाचे अधिकारी बनगिनवार यांच्या मागावर होते. दरम्यान आज सायंकाळच्या सुमारास त्यांच्या कार्यालयात दहा लाख रुपयांची लाख स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी आता समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणCrime Newsगुन्हेगारी