पुणे : जगभरातून विद्यार्थी शिकण्यासाठी पुण्यात येत असतात व त्याच पुण्यात तब्बल १० हजार मुले शालाबाह्य आहेत. धक्का देणारे हे वास्तव उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी गुरुवारी समोर आणले. त्यासाठी त्यांनी एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाचा हवाला दिला व ते खोटे असेल, तर महापालिकेने स्वतंत्र सर्वेक्षण करून तसे सिद्ध करून दाखवावे, असे आव्हानही दिले.शालाबाह्य असलेली ही मुले शब्दश: भीक मागून जगत असतात. सिग्नलजवळ ते केविलवाण्या कसरती करतात किंवा प्लॅस्टिकची खेळणी वगैरे विकतात. त्यांच्यावर कोणाची नजर असते? त्यांना असे करायला कोण भाग पाडते? यामागे एखादे रॅकेट आहे का? याचा पोलीस, प्रशासन यांनी शोध घ्यावा, अशी मागणीही डॉ. धेंडे यांनी केली. ही मुले पुण्यातीलच आहेत असे नाही, कदाचित ती परराज्यातून इथे कोणी तरी आणलेली असू शकतात. त्यांचे आई-वडील, नातेवाईक यांचाही शोध घेण्यात यावा, असे डॉ. धेंडे म्हणाले.स्वतंत्र आराखडा तयार करा१ महापालिका अधिकाºयांना बोलावून डॉ. धेंडे यांनी या मुलांसाठी एक स्वतंत्र आराखडा तयार करण्याचे आदेश दिले. महापालिका शिक्षण विभागाच्या १६ शाळा विद्यार्थ्यांविना पडून आहेत व ही मुले शाळा नाही म्हणून भीक मागत आहेत.२ यावर अधिकारी म्हणून तुम्ही बरेच काही करू शकता, असे आवाहन डॉ. धेंडे यांनी अधिकाºयांना केले. काही स्वयंसेवी संस्थांशी आपण याबाबत चर्चा केली असून त्यांच्या व महापालिकेच्या माध्यमातून या मुलांच्या शाळेची, निवाºयाची व्यवस्था करण्याच्या प्रयत्नात आपण आहोत, असे ते म्हणाले.
तब्बल १० हजार मुले शालाबाह्य, पालिका प्रशासनाला माहिती घेण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 6:54 AM