पुणे: मध्य रेल्वेने पुण्याहून सुटणाऱ्या १० रेल्वे गाड्यांचा फेस्टिव्हल दर्जा काढून त्याला सामान्य गाडीचा दर्जा दिला. त्यामुळे त्या गाडीचे तिकीट दर पूर्वी प्रमाणे होणार आहे, मात्र याची अंमलबजावणी ३० मार्च पासून सुरु होणार आहे. कमी तिकीट दरात प्रवास कारण्यासाठी प्रवाशांना आणखी ३ महिने वाट पाहावी लागणार आहे. याचे तिकीट दर आताच्या तुलनेत स्वस्त असतील. हा प्रवाशांना मोठा दिलासा आहे. दुसऱ्या टप्प्यातील मध्य रेल्वेने पुण्याच्या १० गाडीचा समावेश केला आहे.
रेल्वे प्रशासनाने कोविडच्या काळात प्रवासी संख्येवर मर्यादा आणण्यासाठी रेल्वे गाडयांना दिलेला स्पेशल गाडीचा दर्जा देऊन सर्वच डबे आरक्षित करण्यासोबत त्याच्या तिकीट दरात वाढ केली होती. यासाठी रेल्वेने प्रत्येक गाडीच्या क्रमांकाची सुरुवात शून्यने केली होती. आता त्याला पूर्वीचा क्रमांक देण्यात आला आहे. यात पुणे - दरभंगा, दरभंगा -पुणे , पुणे - लखनऊ ,लखनऊ - पुणे, पुणे - गोरखपूर व गोरखपूर - पुणे, पुणे -बनारस व बनारस -पुणे, पुणे - लखनऊ व लखनऊ - पुणे, या गाडीचा समावेश आहे.