पुणे : शिकवणीसाठी येणाऱ्या आठ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार करणा-या शिक्षकाला न्यायालयाने १० वर्ष कारावास आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विल्सन सिगामनी डॉसन (वय ४५, रा. श्रावस्तीनगर, घोरपडी) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी ८ वर्षीय पीडित मुलीच्या आईने खडक पोलिसांत फिर्याद दिली होती. हा सर्व प्रकार जुलै ते सप्टेंबर २०१६ दरम्यान डॉसन शिकवणी घेत असलेल्या ठिकाणी घडला. अतिरिक्त सरकारी वकील सुरेश गवळी यांनी याप्रकरणी ६ साक्षीदार तपासले. त्यातील मुलीची साक्ष आणि वैद्यकीय पुरावे महत्त्वाचे ठरले. मुंढवा पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक अनिता खेडकर-रासकर यांनी या गुन्ह्याचा तपास केला. पोलीस कर्मचारी बापू शिंदे यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली. डॉसन हा खासगी पद्धतीने त्यांच्या घरी पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांची शिकवणी घेत होता. पीडित मुलगी दोन वर्षांपासून त्याच्याकडे शिकवणीसाठी जात असत. दरम्यान, तीन महिन्यांपासून पीडितेला पोट दुखीचा त्रास होत होता. तसेच पीडिता शिकवणीसाठी जाताना खूप रडत. तसेच तिने क्लासला न जाण्याचा हट्ट धरला होता. त्यामुळे तिच्या आईने क्लासला न जाण्यामागचे कारण विचारले असता हा प्रकार समोर आला. त्यावरून तिच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल दिली होती. दंडाच्या रक्कमेतील १५ हजार रुपये पीडित मुलीच्या आईला देण्यात यावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार करणा-या ट्युशन शिक्षकाला १० वर्ष कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 8:22 PM
पीडित मुलीने क्लासला न जाण्याचा हट्ट धरला होता. त्यामुळे तिच्या आईने क्लासला न जाण्यामागचे कारण विचारले असता हा लज्जास्पद प्रकार समोर आला.
ठळक मुद्दे तीन महिन्यांपासून पीडितेला पोट दुखीचा त्रास पीडित मुलीच्या आईला दंडाच्या रक्कमेतील १५ हजार रुपये