बारामती : बारामती नगरपालिका सध्या शहरातील चर्चेचा विषय ठरत आहे. प्रशासकीय कामाबाबत सतत आरोप-प्रत्यारोप होत आहेत. मागील सर्वसाधारण सभादेखील जोरात गाजली. या वेळी तर विरोधकांच्या भूमिकेतच सत्ताधारी नगरसेवक दिसून आले. नगरपालिकेत गटतटाचे राजकारण व कुरघोड्या करण्याचे डावपेच सुरू आहेत. याच धर्तीवर दि. १८ डिसेंबर मंगळवार हा दिवसदेखील असाच वेगळा ठरला. नगरपालिकेत एकाच वेळी व एकाच विषयावर १०० लोकांनी माहितीच्या अधिकारात अर्ज केले. माहिती अधिकारात प्रथमच मोठ्या संख्येने हे अर्ज केले असल्याची ही पहिलीच वेळ आहे.
नगरपालिकेत आज एकाच वेळी व एकाच विषयावर १०० लोकांनी माहितीच्या अधिकारात अर्ज केल्याचा हा विक्रमच आहे. शहरातील केबलमालक व चालकांनी शहरातील सार्वजनिक ठिकाणी व सरकारी मालमत्तेचा आधार घेत मालमत्ता विद्रूपीकरण केल्याचा आरोप आहे. याबाबत बऱ्याच वेळा तक्रारी झाल्या आहेत. उच्च न्यायालयाने देखील १६ नोव्हेंबर २०१७ ला या सगळ्या केबल काढण्याचा आदेश दिले होते. पण मुख्याधिकाºयांकडून कोणतीही कारवाई का होत नाही, यामागे नेमके काय गौडबंगाल आहे,अशी चर्चा नागरिकांत होत असल्याचे या अर्जदारांनी सांगितले.या केबल टाकणाºया मालक व चालक यांच्यावर कोणती कारवाई केली, या अंथरलेल्या केबलला कोणता कर आकारला आहे, याविषयी अर्ज केलेल्या व त्यावर केलेली कार्यवाही सविस्तर माहिती मिळावी, सार्वजनिक मालमतेवर अंथरलेल्या केबलचालकांच्या फर्मची नावे व त्यांच्या मालकांची नावे, तसेच उच्च न्यायालयाने या सर्व केबल काढून टाकण्याचा पालिकेला दिलेला आदेश याची प्रत अशा ६ मुद्यांच्या मागण्या केल्या आहेत.अर्जातील महत्वाच्या मुद्दयांवर भरशंभर लोकांनी केलेल्या मागणीत ६ मुद्दे आहेत. यात सार्वजनिक संपत्तीवर बेकायदेशीरपणे टाकलेल्या केबलचा न्यायालयाने दिलेल्या आदेशाची माहिती बारामती नगर परिषदेला केव्हा मिळाली, याबाबतची आवकजावक रजिस्टर पुस्तकाची नोंद याची सविस्तर माहिती मिळावी,४या टीव्ही केबलच्या वायर पालिकेच्या मालमतेवर अंथरून शहराचे विद्रूपीकरण होत आहे. यावर तातडीने योग्य ती कारवाई व्हावी; अन्यथा मोठे आंदोलन करणार असल्याचे या अर्जदारांनी बोलताना सांगितले. सध्या तापमानात घट झाल्याने नागरिक थंडीने कुडकुडले आहेत. मात्र, अंतर्गत राजकीय कुरघोड्यांनी अंतर्गत वातावरण तापणार असल्याचे चित्र आहे.४राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांंनी शहराचे विद्रूपीकरण होऊ नये यासाठी लाखो रुपये खर्च करून शहरातील सगळ्या वीजवाहिन्या भूमिगत करून घेतल्या आहेत.