शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
3
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
4
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
5
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
6
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
7
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
8
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
9
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
10
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
11
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
13
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
14
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
15
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
16
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
17
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
18
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
19
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
20
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?

निवडणुकीसाठी १०० कोटींचा झटका

By admin | Published: December 28, 2016 4:32 AM

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या सभेत तब्बल शंभर कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. दीड महिन्यावर येऊन ठेपलेल्या महापालिका

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या सभेत तब्बल शंभर कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. दीड महिन्यावर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीसाठी कधीही आचारसंहिता लागू होईल, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे स्थायी समितीने मंगळवारी शंभर कोटींचा धमाका केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात होती. सभापती डब्बू आसवानी हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते. त्यामुळे मोठ्या खर्चाचे प्रस्ताव स्थायी सभेपुढे मांडले जावेत, यासाठी समितीचा आटापिटा सुरू होता. अशा परिस्थितीत मंगळवारी स्थायी समितीची सभा झाली. या सभेत १०० कोटी रुपये खर्चाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. यामध्ये विषयपत्रिकेवरील ६५ कोटी रुपये खर्चाचे, तर ऐनवेळचे ३५ कोटी रुपये खर्चाचे विषय होते. स्थायीची सभा दुपारी अडीच वाजता बोलावण्यात आली होती. मात्र, सायंकाळी सहा वाजले, तरी सभा सुरू झाली नाही. अखेर सायंकाळी साडेसहा वाजता सभा सुरू झाली. त्यामध्ये १०० कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. शहरातील विविध ठिकाणाच्या कंपनी तसेच महापालिका यांनी खोदलेल्या रस्त्यांचे चर बुजविण्यासाठी येणाऱ्या ६ कोटी ८३ लाख ९५ हजार रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच सांगवी-किवळे रस्त्यावरील डांबरीकरण व पदपथासाठी २ कोटी १ लाखाला मंजुरी देण्यात आली. (प्रतिनिधी)- महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत मागासवर्गीय कल्याणकारी योजनेंतर्गत इयत्ता ५वी ते ७वीमधील ८२४ पात्र विद्यार्थ्यांना प्रत्येकी २ हजार रुपये याप्रमाणे १६ लाख ४८ हजार रुपये, तसेच ८वी ते १०वीमधील ११५९ पात्र विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३ हजार रुपयेप्रमाणे ३४ लाख ७७ हजार रुपये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी येणाऱ्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.