लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : महापालिका निवडणुकीपूर्वी भक्ती-शक्ती चौकात उड्डाणपूल उभारण्याचा विषय राष्ट्रवादी काँगे्रसने स्थायी समितीसमोर आणला होता. मात्र, भाजपाच्या नेत्यांनी श्रेयवादामुळे या विषयाला खोडा घातला होता. महापालिका निवडणुकीनंतर सत्तेत आलेल्या भाजपाने नव्वद कोटींचा विषय स्थायी समितीसमोर आणला आहे. निगडीतील भक्ती-शक्ती चौक ते दापोडी हा रस्ता पिंपरी- चिंचवड महापालिकेतर्फे विकसित केला आहे. या मार्गावर सार्वजनिक बीआरटीएस बस वाहतूक सुरू करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. परंतु, याठिकाणी असलेल्या चौकामुळे लहानमोठे अपघात नेहमीच होत असतात. त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे आणि वाहतुकीची कोंडीही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी या चौकात ग्रेडसेपरेटर आणि उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सुमारे १३५ करोड रुपये खर्चाला महापालिकेच्या निवडणुकीपूर्वीच्या सर्वसाधारण सभेत मान्यता दिली होती. मात्र, त्यानंतर शंभर कोटींच्या कामावरून राष्ट्रवादी आणि भाजपात श्रेयवादाचे राजकारण सुरू झाले. हा प्रस्ताव तत्कालीन स्थायी समिती सभेसमोर येऊच दिला नाही. भाजपाची सत्ता आल्यानंंतर मंगळवारी होणाऱ्या स्थायी समिती सभेसमोर हा प्रस्ताव मंजुरीसाठी आला आहे. चार ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यापैकी एका कंपनीकडून ९० कोटी रुपये खर्चात काम करून घेण्यात येणार आहे. सभेत पहिल्यांदाच १०० कोटींची कामे सभापटलावरस्थायीच्या सातव्या सभेत पहिल्यांदाच १०० कोटींची कामे मंजुरीसाठी विषयपत्रिकेवर ठेवली आहेत. त्यामध्ये भक्ती - शक्ती चौकातील उड्डाणपूल (९० कोटी), पाणी शुद्धीकरण प्रक्रियेसाठी आवश्यक द्रवरूप पॉली अॅल्युमिनिअम क्लोराईड खरेदी (१ कोटी ८३ लाख), पावडर पॉली अॅल्युमिनिअम क्लोराईड खरेदी (६४ लाख ५८ हजार रुपये), विविध उद्यानांचे देखभाल- संरक्षण (२ कोटी ८० लाख), महिलांकरिता स्वच्छतागृह बांधणे (१४ लाख), ब आणि क क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील घरोघरचा कचरा वाहनामार्फ त गोळा करून संकलन केंद्रात वाहून नेणे (१ कोटी १६ लाख), रस्ते व चौकामध्ये पादचाऱ्यांसाठी सुविधा पुरविणे (१३ लाख), मराठी, उर्दू माध्यम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पुस्तके खरेदी करणे (५ लाख ५३ हजार रुपये) आदी कामांचा समावेश आहे. असा असेल पूल पुणे-मुंबई महामार्गावर प्राधिकरण येथे भक्ती-शक्ती चौक आहे. या चौकातील प्रत्येक दिशेला जाणारे वाहन समगतीने फिरते राहून चौक ओलांडण्याचे नियोजन केलेले आहे. चौकाजवळच शहराचा मानबिंदू असणारा भक्ती-शक्ती शिल्पसमूह आहे. त्याचे सौंदर्य कोठेही कमी होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. रोटरीमुळे पादचाऱ्यांना चौकाच्या कोणत्याही दिशेने ये- जा करणे शक्य होणार आहे. नियोजित उड्डाणपुलाचे क्रॅश बॅरिअर हे भक्ती- शक्ती शिल्पाच्या तळाशी समपातळीमध्ये आहे. यामुळे बसमधील प्रवाशांनादेखील पुलावरून संपूर्ण शिल्पाचे दर्शन होणार आहे. भक्ती- शक्ती चौकामध्ये तीन लेव्हलमध्ये बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच ग्रेडसेपरेटर स्पाइन रस्त्याला समांतर आणि येणाऱ्या - जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र लेन असणार आहे. प्राधिकरण ते मोशी दक्षिण- उत्तर वाहतुकीमुळे शहर जोडणार असून, त्याची लांबी ४२० मीटर आणि २४ मीटर रुंदीच्या दोन लेन, ५.५० मीटर उंची असणार आहे. नाशिक महामार्गाकडून देहूरोड - कात्रज बावधन मार्गाकडे जाणारी जड वाहने ग्रेडसेपरेटरमधून जाण्याची व्यवस्था केलेली आहे.
स्थायीचे १०० कोटींचे उड्डाण
By admin | Published: May 22, 2017 5:05 AM