शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
4
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
5
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
6
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
7
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
8
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
9
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
10
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
11
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
12
"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या
13
कंगना रणौतने चक्क आर्यन खानचं केलं कौतुक; म्हणाली, "फिल्मी कुटुंबातून येऊनही..."
14
Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान
15
२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
16
Pune Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ५.५३ टक्के मतदान, सर्वाधिक ७.४४ टक्के मतदानाची कसब्यात नोंद
17
पनवेल रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू; आरोग्य व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा आणखी एक बळी
18
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
20
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची टिप्पणी

पालिकेचे १०० कोटी पाण्यात

By admin | Published: February 06, 2015 12:24 AM

खडकवासला प्रकल्पातून शहरासाठी जादा पाणी मिळावे, म्हणून महापालिकेकडून शुद्ध केलेले तब्बल साडेसहा टीएमसी सांडपाणी शेतीसाठी सोडण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

सुनील राऊत ल्ल पुणेखडकवासला प्रकल्पातून शहरासाठी जादा पाणी मिळावे, म्हणून महापालिकेकडून शुद्ध केलेले तब्बल साडेसहा टीएमसी सांडपाणी शेतीसाठी सोडण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. तब्बल १०० कोटी खर्चून उभारण्यात आलेला हा प्रकल्प मार्चअखेरीस पूर्ण होणार आहे. मात्र, हे पाणी सोडण्यात येणारा जुना कालवा (बेबी कॅनॉल) दुरुस्तीसाठीच्या सुमारे चार निविदा राज्य शासनाने रद्द केल्याने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेल्या तसेच गळती असलेल्या या ४५ वर्षे बंद असलेल्या कालव्यातून सोडलेले पाणी शेतकऱ्यांना मिळणार की गळतीद्वारे वाया जाणार, याबाबत महापालिका आणि स्वत: पाटबंधारे विभागही संभ्रमात पडला आहे. आघाडी शासनाच्या काळात राज्यातील सिंचन विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप झाल्याने राज्य शासनाने राज्यातील तब्बल ६२४ कोटी २८ लाख रुपयांच्या सुमारे १२८ निविदा रद्द केल्या आहेत. या निविदांमध्ये खडकवासला प्रकल्पातील जुन्या आणि नव्या कालव्याच्या दुरुस्तीच्याही सुमारे ८ निविदा रद्द करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागातील अधिकृत सूत्रांनी लोकमतशी बोलताना दिली. या रद्द करण्यात आलेल्या निविदांमध्ये महापालिकेकडून सांडपाणी शुद्ध करून शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या बेबी कॅनॉलच्या दुरुस्तीच्या सुमारे ८ ते १० कोटी रुपयांच्या निविदांचा समावेश असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.४महापालिकेने शेतीसाठी सांडपाणी सोडल्यानंतर पालिकेला पाटबंधारे विभाग १६.५० टीएमसी पाणी देणार आहे. त्यामुळे सिंचनाचे पाणी आपोआपच कमी होईल, तर जे साडेसहा टीएमसी पाणी शेतीसाठी सोडले जाणार आहे, त्यातील केवळ अर्धा टीएमसी पाणी पुरेल एवढेच सिंचन क्षेत्र बेबी कॅनॉलवर आहे. त्यामुळे सहा टीएमसी पाण्याचा वापरच होणार नसल्याचे महापालिका तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी सांगतात. परिणामी, पालिकेने या प्रकल्पासाठी केलेल्या या खर्चाचा काहीच फायदा होणार नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.पाटबंधारे विभागाची कोंडी४शेतीसाठी पाणी सोडण्यात येणारा जुना कालवा हा १८८५मध्ये खडकवासला धरण बांधल्यानंतर पूर्णत्वास आहे. १९६२मध्ये पानशेत धरण फुटल्यानंतर नवीन कालवा बांधण्यात आला. हा कालवा १९७०मध्ये सुरू झाल्यानंतर जुना कालवा बंद करण्यात आला. तो गेल्या ४५ वर्षांपासून बंदच आहे. ४या कालव्याचे बांध अनेक ठिकाणी खोदण्यात आले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गळतीची शक्यता आहे. तर, अनेक ठिकाणी त्यात भराव टाकून अतिक्रमणेही करण्यात आलेली आहेत. ४पालिकेकडून या कालव्यात शेतीसाठी पाणी सोडण्यापूर्वी त्याची दुरूस्ती होणे आवश्यक होते. त्याअनुषंगाने सिंचन विभागाने त्याच्या चार निविदा काढल्या होत्या. त्यांची रक्कम सुमारे ८ ते १० कोटींची होती. मात्र, निविदा रद्द झाल्याने ही दुरुस्ती होणे अशक्य आहे.काय आहे शेतीसाठी पाणी देण्याची योजना ?४२००५-0६पर्यंत शहराचा विस्तार मर्यादित असल्याने पालिकेला खडकवासला प्रकल्पातील केवळ १० ते ११ टीएमसी पाण्याची गरज भासत होती. त्यामुळे २०११पर्यंत पालिकेस पाटबंधारे विभागाकडून दर वर्षी ११.५० टीएमसी पाणी दिले जात होते. त्यानंतर शहराचा विस्तार वाढतच असल्याने पालिकेकडून २०१२पासून शहरासाठी १६.५० टीएमसी पाणी देण्याची मागणी करण्यात आली. मात्र, पालिकेस जादा पाणी दिल्यास शेतीसाठीचे पाणी कमी होण्याची शक्यता असल्याने महापालिकेने नदीत सोडलेले तब्बल साडेसहा टीएमसी सांडपाणी शुद्ध करून शेतीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ४त्यानुसार, पालिकेकडून मुंढवा येथे बंधारा बांधण्यात आला असून जॅक वेल बांधली जात आहे. हे पाणी या बांधातून उचलून सुमारे साडेतीन किलोमीटर लांब जलावाहिनीतून हडपसर येथून बेबी कॅनॉलद्वारे शेतीसाठी सोडले जाणार आहे. हे काम ९० टक्के पूर्ण झाले असून त्यासाठी ९० कोटी रुपयांचा खर्चही झाला आहे. उर्वरित १० टक्के काम मार्चअखेरीस पूर्ण झाल्यानंतर कालव्यातून पाणी सोडले जाणार आहे.