शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
3
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
4
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
5
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
6
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
7
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
9
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
10
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
11
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
12
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
13
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
14
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
15
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
16
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
17
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
18
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
19
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...

सांगलीच्या स्वच्छतेसाठी पुणे महापालिकेचे १०० स्वच्छता कर्मचारी रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 9:06 PM

रस्त्यांवर आणि गल्ली बोळातील गाळ, कचरा साफ करण्यावर भर दिला जाणार आहे. यासोबतच पालिकेच्या कर्मचाºयांनी जमा केलेले धान्य, संसारोपयोगी वस्तू आणि कपडे सांगलीला पाठविण्यात येत आहेत.

पुणे : पुराने थैमान घातलेल्या सांगली जिल्ह्यामधील सार्वजनिक स्वच्छतेसाठी पुणे महापालिका सरसावली असून तब्बल १०० स्वच्छता कर्मचाºयांचे पथक शनिवारी संध्याकाळी रवाना झाले. सांगलीमधील पाणी ओसरत असून तेथील रस्ते प्रामुख्याने स्वच्छ करुन देण्यात येणार असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी सांगितले. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी विविध यंत्रणांच्या बैठकीमध्ये पुणे महापालिकेने शक्य होईल तेवढी मदत करावी असे आवाहन केले होते. पुण्यातील मदत व बचाव कार्यात अडथळा येणार नाही अगर मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही याची काळजी घेऊन मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत पुणे महापालिकेचे १०० स्वच्छता कर्मचारी आणि काही अधिकारी सांगलीला जाणार आहेत. स्वच्छतेसाठी लागणारे फावडे, घमेली, झाडूसह सर्व साहित्य या कर्मचाºयांनी सोबत घेतले आहे. सांगली महापालिकेने जेटींग मशीन उपलब्ध करुन देण्याची विनंती केली आहे. त्यानुसार एक जेटींग मशीनही पाठविण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे मोळक म्हणाले. रस्त्यांवर आणि गल्ली बोळातील गाळ, कचरा साफ करण्यावर भर दिला जाणार आहे. यासोबतच पालिकेच्या कर्मचाºयांनी जमा केलेले धान्य, संसारोपयोगी वस्तू आणि कपडे सांगलीला पाठविण्यात येत आहेत. पालिकेच्या कर्मचाºयांनी कर्तव्यासोबतच माणुसकी जपली असून पालिका आयुक्तांनी या उपक्रमाचे कौतूक केले आहे. 

टॅग्स :Sangli Floodसांगली पूरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका