Russia Ukraine War: युक्रेनमध्ये पुणे जिल्ह्यातील तब्बल 100 विद्यार्थी अडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 07:45 PM2022-02-25T19:45:13+5:302022-02-25T19:45:26+5:30

रशियाने सुरू केलेल्या युद्धामुळे युक्रेन देशात पुणे जिल्ह्यातील तब्बल 100 विद्यार्थी अडकले असल्याची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे

100 students from Pune stranded in Ukraine | Russia Ukraine War: युक्रेनमध्ये पुणे जिल्ह्यातील तब्बल 100 विद्यार्थी अडकले

Russia Ukraine War: युक्रेनमध्ये पुणे जिल्ह्यातील तब्बल 100 विद्यार्थी अडकले

Next

पुणे : रशियाने सुरू केलेल्या युद्धामुळे युक्रेन देशात पुणे जिल्ह्यातील तब्बल 100 विद्यार्थी अडकले असल्याची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे.  यापैकी उशिरापर्यंत 77 जणांची यादी नावासह आणि त्यांच्या पासपोर्ट क्रमांक नमूद करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने विद्यार्थ्यांची यादी तयार करून, या विद्यार्थ्यांना पुन्हा भारतात आणण्यासाठी ही यादी शासनाला पाठविण्यात आली आहे.  जिल्ह्यातील नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असल्यास त्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यलयातील नियंत्रण कक्षाला देण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून गुरूवारी आवाहन करण्यात आले होते.
 
युक्रेनमध्ये अडकलेल्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पासपोर्ट क्रमांक मिळाला त्याचा उल्लेख देखील त्यांच्या नावापुढे करण्यात आला आहे. युक्रेन देशात अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठी दिल्लीमध्ये मदत कक्ष ही सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, रशिया-युक्रेन वाद वाढू लागला आहे. युद्ध सुरू झाल्याच्या परिस्थितीने पालकांची चिंता वाढली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जाणारी यादी ही दुतावासाला पाठविण्यात येणार आहे. दुतावासाच्या विहीत नमुण्यामध्येच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राज्याला माहिती पाठविण्यात येणार आहे. ती पुढे दुतावासाला देण्यात येईल.

Web Title: 100 students from Pune stranded in Ukraine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.