शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
2
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
3
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
4
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
5
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
6
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
7
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
8
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
9
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
10
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
11
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
12
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
13
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
14
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
15
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
16
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
17
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
18
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
19
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
20
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट

१०० शिक्षक अतिरिक्त?

By admin | Published: August 29, 2016 3:21 AM

तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २७६ प्राथमिक शाळांपैकी २४ केंद्रांतील २ ते १० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या ५७ शाळा आहेत

भोर : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २७६ प्राथमिक शाळांपैकी २४ केंद्रांतील २ ते १० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या ५७ शाळा आहेत. प्रत्येक शाळेवर २ पासून १०पर्यंत असा एकूण ४५६ पट आहे. प्रत्येक शाळांवर दोनप्रमाणे एकूण ११४ शिक्षक कार्यरत आहेत. वीसगाव, हिर्डोशी व आंबवडे, वेळवंड व भुतोंडे खोऱ्यात १०पेक्षा कमी शाळापट असणाऱ्या सर्वाधिक शाळा आहेत. या शाळा शासन बंद करण्याच्या विचारात असून यामुळे सुमारे १००पेक्षा अधिक शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता आहे. भोर तालुक्यातील २४ केंद्रांर्तगत येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या १० पेक्षा कमी पट असणाऱ्या शाळांची पटसंख्या खालीलप्रमाणे :माळवाडी रायरेश्वर (पट २), साळवीवाडी (पट २), शेरताटी धनावडेवाडी (३), वारवंड (३), केशवनगर (४), नांगरेवाडी (४), चहाणवाडी (४), म्हस्केकिंद्रे वस्ती (४), करंजगाव (४), मानटवस्ती (४), घेवडेश्वर (४), मिरकुटवाडी (४), जयतपाड (४), भांड्रवली डेरे (४), उदयनखानवाडी (५), ब्राम्हणघर (५), केंढाळकर वस्ती (५), वरपेवाडी (५), सणसवाडी (५), टोंगवाडी पसुरे (५), सणसवाडी शिंद (५), वाघमाची बोपे (५), बुदगुेडवाडी भाबवडी (६), जेधेवाडी (६), पोळवाडी (६),पाचलिंगे (६), निगडे खेंबा (६), विरवाडी (६), जांभुळवाडी (६), हिर्डाेशी (६), तांभाड नं. १ (७), देवघरे आवाड (७), करंजेवाडी (७), कुंड (७), पांगारी आश्रम (७), देऊळवाडी (८), तांभाड २ (८), धारांबे (८), पऱ्हर बु. (८), रायरेश्वर (८), राजीवडी (८), उंबार्डे (८), धनगरवस्ती पसुरे (८), सुतारवाडीमळे (८), बुरुडमाळ (८), अनंतनगर (९), हातवे बु. (९), कारुंगण (९), वेणुपुरी (९), खालचे गाव कोंढरी (९), चांदावणे (९), मानकरवाडी (१०), राऊतवाडी (१०), म्हाकोशी (१०), घनगरवस्ती (१०), तळजाईवाडी (१०) अशा एकूण ५३ शाळा असून, ३४९ विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी तब्बल ११४ शिक्षक मंजूर आहेत. त्यातील बदल्यांमुळे १०६ शिक्षक कार्यरत आहेत. दुर्गम डोंगरी भागातील शाळांना रस्ता नाही. याशिवाय अनेक अडचणी भेडसावत असल्याने निकषानुसार सदरच्या शाळांना या अटीतून वगळले जाणार असल्याची चर्चा आहे.(वार्ताहर)