संतोष गाजरे
कात्रज : पंधरा ऑगस्टच्या रात्री अचानकच साडे अकराच्या दरम्यान पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्या सह पोलीस उप आयुक्त, सहा. पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक यांच्यासह १०० ते २०० पोलिसांसह कात्रज चौकात भेट दिली.
१४ ऑगस्टला दुपारी गौरी पटेल वय (१०) ही मुलगी शिवतेज नगर बिबवेवाडी येथून बेपत्ता झाली होती ही मुलगी मतिमंद असून बिबवेवाडी पोलिसांकडून याचा शोध सुरू होतो. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे शोधले असता ती कात्रज परिसरातून गेल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. चोवीस तास उलटूनही मुलगी मिळून येत नसल्याने पोलीस आयुक्त यांनी रात्रीच्या वेळी सर्वं वरिष्ठ अधिकारी व पोलिसांना कडक सूचना देत शोध मोहीम युद्धपातळीवर सुरु करण्याचे आदेश देत स्वतः कात्रज परिसरात येऊन परिसराची पाहणी केली जवळपास एक ते दोन तास पोलीसांकडून कात्रज पुल परिसरात शोधमोहीम सुरु होती. गुन्हे शाखेच्या टीम व इतर टीम कडून शोध सुरु असताना रात्री १ च्या सुमारास बेपत्ता मुलगी कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्विगी डिलिव्हरी करणाऱ्या मुलाला मिळवून आले व त्यांनी ती पोलिसांच्या ताब्यात दिली. मुलगी सुखरूप असून पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. कात्रज परिसरामध्ये अचानकच रात्रीच्या वेळी पोलीस आयुक्तांसह एवढ्या पोलिसांचा फौज फाटा आल्याने नागरिकांनागरिकांकडून वेगवेगळे तर्क वितर लावण्यात येत असून नागरिक आश्चर्यचकित झाले होते.
चोवीस तास उलटूनही मुलगी सापडली नव्हती. दहा वर्षाची मुलगी मिसिंग झाल्याने काही गंभीर गोष्टी आढळून आल्याने युद्ध पातळी वर शोध मोहीम लावली. व पोलिसांना यश आले मुलगी सापडली असून ती सुखरूप आहे. - अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे.