धनकवडी : सेल्फीच्या नादात पुरंदर तालुक्यातील पाथरवाडी येथील पाझर तलावांमध्ये एक तरुण बुडाल्याची घटना, मंगळवारी सायंकाळी घडली, कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्राला जवानांनी रात्री साडेअकरा वाजता लाईफ रिंगच्या साह्याने मुलाला बाहेर काढला. अनिश तानाजी खेडेकर (वय १५ वर्षे) राहणार संभाजी नगर, तीन हत्ती चौक, धनकवडी, असे मृत मुलाचे नाव आहे. पुरंदर तालुक्यातील पाथरवाडी येथील तलावामध्ये एक तरुण बुडाल्याची माहिती पोलीस पाटील सचिन दळवी याने सासवड पोलिसांना दिली. सासवड पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि स्थानिकांच्या मदतीने मुलाचा शोध सुरू केला.
दरम्यान स्थानिक व प्रथमदर्शनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील नव तरुण सहलीसाठी याठिकाणी आले होते. या ठिकाणी ते फोटो काढत होती. यातील एक तरुण पाण्यामध्ये उतरला होता, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पडला आणि बुडाला. स्थानिक नागरिक व पोलीस रात्री उशिरापर्यंत शोध घेत होते. दरम्यान कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्राला रात्री दहा वाजता मुलगा पाण्यात बुडाल्याची खबर मिळाली. अग्निशमन पथकाने तात्काळ घटनास्थळी शोध मोहीम सुरू केली व ११. ३० वाजता लाईफ रिंगच्या साह्याने मुलाला बाहेर काढला. यामधे कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्राचे वाहनचालक रविंद्र हिवरकर, जवान दशरथ माळवदकर, संदिप पवार, औंकार ताटे व गोविंद गित्ते यांनी सहभाग घेतला.
अनिश खेडेकर संभाजीनगर येथे राहत होता. तो सहकारनगर येथील विद्या निकेतन शाळेत दहावीमध्ये शिकत होता. त्याचे वडील तानाजी खेडेकर रिक्षा चालक असून आई गृहिणी आहे. त्या दोन भाऊ आहे. अनिश च्या अकाली मृत्यूने संभाजीनगर मध्ये शोककुळा पसरली असून आईवडीलांना शोक अनावर झाला होता.