प्रथम फलंदाजी करताना ११ ऐसेस संघाने २० षटकांत ६ बाद २०१ धावा केल्या. पुणे रेंजर्स क्रिकेट क्लबला १९.२ षटकांत १७९ धावांवर रोखत ११ ऐसेसने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
११ ऐसेस संघाकडून हिकांत कामदार (३१ धावा) आणि साजन मोदी (२० धावा) यांनी संघाला सावध सुरुवात करून दिली. वरुण गुजर (४८ धावा) आणि निखिल जैन (४६ धावा) यांनी तिसऱ्या गड्यासाठी २५ चेंडूत ६५ धावांची भागीदारी करून संघाला २०१ धावांचे शिखर गाठून दिले.
आव्हानाचा पाठलाग करताना पुणे रेंजर्स क्रिकेट क्लबची सुरुवात खराब झाली. सातव्या षटकात ५ बाद ३१ धावा असा संघ अडचणीत आला. त्यावेळी पुणे रेंजर्सकडून कौस्तुभ बाकरेने ५१ चेंडूंत १३ चौकार व २ षटकारांसह ८२ धावा करत एकाकी झुंज दिली. मात्र, त्याला खंबीर साथ न मिळाल्याने संघाचा डाव १९.२ षटकात १७९ धावांवर आटोपला. निखिल जैन सामनावीर ठरला.
पारितोषिक वितरण कॅप्टन नीलेश गायकवाड आणि कोद्रे फार्मचे विक्रम देशमुख यांच्याहस्ते झाला.
चौकट
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट
फलंदाज- भूषण सावे (मॅव्हरीक्स ११, ३५७ धावा)
गोलंदाज- पंकज गोपालनी (११ ऐसेस, १५ विकेट)
मालिकावीर - कौस्तुभ बाकरे (पुणे रेंजर्स, २०७ धावा व १२ विकेट)
फोटो - ११ ऐसेस टीम
- कौस्तुभ बाकरे