पुणे : सून पांढऱ्या पायगुणाची आहे, तिच्यामुळे तू आमदार मंत्री होणार नाही, असे सांगून त्यांचा संसार मोडण्यासाठी अघोरी कृत्याचा वापर झाल्याचे दिसून आल्याने चतु:श्रृंगी पोलिसांनी ज्योतिषाचार्य रघुनाथ येमूलला अटक केली. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. शहरात गेल्या साडेतीन वर्षात जादूटोणा कायद्यान्वये आतापर्यंत तब्बल ११ गुन्हे दाखल आहेत. या ११ गुन्ह्यात तब्बल ३० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
यावर्षी जानेवारीपासून जून अखेर अशा प्रकारचे ४ गुन्ह्यांमध्ये १४ आरोपी आहेत. गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात एकही गुन्हा दाखल झाला नव्हता. २०१९ मध्ये जादूटोणा कायद्यान्वये ६ गुन्हे दाखल असून त्यात १४ आरोपी आहेत.
जादूटोणा कायद्यान्वये दाखल झालेले गुन्हे
वर्ष दाखल गुन्हे आरोपी
२०१८ १ २
२०१९ ६ १४
२०२० - -
जून २०२० ४ १४