ठळक मुद्देबाळावर खासगी रुगणालयात उपचार सुरू; बाळ ८० ते ८५ टक्के भाजलेबाळाची प्रकृती चिंताजनक : अग्निशामक दल
पुणे : कोंढवा परिसरात भाग्योदय नगर येथे ११ दिवसांचे बाळ शेक देताना अचानक शेकोटीत पडून गंभीर भाजल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी साडे अकरा वाजता घडला. या बाळावर खासगी रुगणालयात उपचार सुरू आहेत. मात्र ते बाळ ८० ते ८५ टक्के भाजले आहे.मोहंमद सगीर शेख (रा. सुमित्रा अपार्टमेंट, भाग्यदोय नगर, कोंढवा) असे बाळाच्या वडिलांचे नाव आहे. बाळाची आई त्याला शेक देत होती. त्यावेळी ती त्याला तेथे ठेऊन आत गेली आणि त्याच वेळी बाळ अचानक एका अंगावर झाले आणि त्या शेकोटीवर पडले. शेकोटीवरील भांडे खाली पडले. त्यामुळे कागदी पोत्यांना आग लागली. त्यात बाळ गंभीर जखमी झाले. बाळाला खासगी रुग्णालयात नेले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे अग्निशामक दलाकडून सांगण्यात आले.