पुणो : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी 11, तर उपाध्यक्षपदासाठी 9 जणांनी अर्ज केले असून, 19 आणि 2क् तारखेला मुलाखती घेतल्या जाणार आहेत. 21 सप्टेंबर रोजी निवडणूक होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक सदस्य जिल्हा परिषदेत आहेत. या पक्षाने इच्छुकांना अर्ज सादर करण्यास सांगितले होते.
आज अखेरच्या दिवसार्पयत अध्यक्षपदासाठी विश्वास देवकाते, मंगलदास बांदल, शुक्राचार्य वांजळे, शांताराम इंगवले, दत्तात्रय गुंड,
विराज काकडे, विक्रमसिंह जाधवराव, मथाजी पोखरकर तसेच
मनिषा कोरेकर व सारिका इंगळे यांनी आज सादर केले.
विद्यमान उपाध्यक्ष प्रदीप कंद यांनी अर्ज सादर केलेला नसला तरी त्यांच्याही नावाचा पक्षश्रेष्ठी विचार करू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जा¨लदर कामठे यांनी सांगितले की, जाधवराव व इंगळे यांनी उपाध्यक्षपदासाठीही अर्ज सादर केले असून दादासाहेब कोळपे, शांताराम सोनवणो, नवनाथ पारगे, वंदना धुमाळ, प्रमोद कानडे, राणी शेळके यांचा अन्य इच्छुकांमध्ये समावेश आहे. अध्यक्षपदाबाबतचा सर्वाधिकार पक्षाचे नेते अजित पवार यांना आहे. (वार्ताहर)