पुणे : क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवून एकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वरुणदीप श्रीवास्तव (वय ३८, रा. वाघोली) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला. क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल असे सांगून तक्रारदार यांना पैसे गुंतवण्यास सांगितले. त्यानंतर बनावट वेबसाईटच्या आधारे खोटा नफा मिळत असल्याचे भासवून तक्रारदार यांना एकूण १० लाख ८० हजार रुपये भरण्यास भाग पाडले. प्रत्यक्षात ते पैसे विड्रॉल केले असता त्यामध्ये अडचणी येत होत्या त्यामुळे विचारणा केली. मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आले. याप्रकाणरी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक ढाकणे हे करत आहेत.