पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये नव्याने ३९७ पीएचडी गाइड उपलब्ध झाल्याने त्यांच्याकडील पीएचडी मार्गदर्शनासाठीच्या ११०० जागा नव्याने उपलब्ध झाल्या आहेत. विद्यापीठाच्या नुकत्याच पार पडलेल्या पीएचडी प्रवेशप्रक्रियेत सहभाग घेऊन मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या ४ हजार विद्यार्थ्यांना या जागांवर प्रवेश मिळविण्यासाठी पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून नुकतीच विविध विषयांच्या पीएचडी प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र विद्यापीठाकडे पीएचडी गाइडची नोंदणी कमी झाल्याने प्रवेशासाठी खूप कमी जागा उपलब्ध झाल्या होत्या. दरम्यान, पीएचडी प्रवेशासाठी ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार सर्व विभागांनी त्यांच्या पीएचडी प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण केली. जागा कमी असल्याने अनेक विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी प्रवेश मिळू शकलेला नव्हता, या विद्यार्थ्यांना आता पीएचडी प्रवेशासाठी पुन्हा एकदा संधी प्राप्त झाली आहे. सर्व विषयांनिहाय साधारणत: ४ हजार विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरले होते. मुलाखतीला पात्र ठरल्यानंतर काही कारणांमुळे मुलाखत देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनाही पुन्हा मुलाखत देता येणार आहे. पीएचडी प्रवेशप्रक्रियेत जे विद्यार्थी मुलाखतीपर्यंत पोहोचले होते त्यांना या प्रवेशासाठी पुन्हा एकदा मुलाखत देता येणार आहे. सेट/नेट उत्तीर्ण असलेल्या, तसेच विद्यापीठाकडून घेण्यात आलेली पीएचडीपूर्व परीक्षा (पेट) उत्तीर्ण झालेले विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरले होते. तांत्रिक अडचणींमुळे अनेक प्राध्यापकांना पीएचडी गाइड म्हणून नोंदणी करता आली नव्हती. त्या अडचणी दूर करून त्यांची पीएचडी गाइड म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर पीएचडी गाइड म्हणून काम करण्यासाठी आवश्यक असलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्या प्राध्यापकांना नव्याने पीएचडी गाइड म्हणून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे ३९७ पीएचडी गाइडकडील ११०० जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत.लिंक उपलब्ध करणारपीएचडी प्रवेशप्रक्रियेत मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या ४ हजार विद्यार्थ्यांना नव्याने पीएचडी प्रवेशासाठी उपलब्ध झालेल्या ११०० जागांवर प्रवेश मिळविण्यासाठी पुन्हा संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. नव्याने उपलब्ध झालेल्या गाइडकडील जागांनुसार पीएचडी केंद्र निवडण्यासाठी विद्यार्थ्यांना लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लिंक्स उपलब्ध करून दिली जाणार आहे.
पुणे विद्यापीठामध्ये पीएचडीसाठी ११०० जागा, लिंक उपलब्ध करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 12:28 PM
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून नुकतीच विविध विषयांच्या पीएचडी प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र विद्यापीठाकडे पीएचडी गाइडची नोंदणी कमी झाल्याने प्रवेशासाठी खूप कमी जागा उपलब्ध झाल्या होत्या.
ठळक मुद्देमुलाखत दिलेल्या उमेदवारांना पुन्हा संधी